गजानन मंदिर कांद्री येथुन श्री क्षेत्र धापेवाडा करिता पालखी व दिंडी यात्रा प्रस्थान.

कमलसिंह यादव 

  प्रतिनिधी

पारशिवनी  – श्री संत शिरोमणी , श्री संत गजानन महाराज यांना श्री संत कोलवास्वामी यांच्या भेटीकरिता व जगतपिता श्री विठ्ठमाऊली यांच्या दर्शनास गजानन मंदिर कांद्री  ते पाटणसावंगी ते श्री क्षेत्र धापेवाडा पर्यंत पालखी व दिंडी सह पदयात्रा वारी चे श्री संत गजानन महाराज मंदिर , वार्ड क्रमांक ५ गजानन नगर कांद्री व सर्व ग्रामवासी द्वारे एक दिवसीय पदयात्रा सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .

      मंगळवार दि.४ जुलै ला सकाळी ५ वाजता श्री संत गजानन महाराज मंदिरात श्री चे मंगल स्नान करुन विधिवत पूजा अर्चना व महाआरती करण्यात आली . त्यानंतर श्री संत गजानन महाराज मंदिर येथुन भजन कीर्तन करीत पालखी पदयात्रा काढण्यात आली . पदयात्रा राष्ट्रीय महामार्गा ने संताजी नगर हनुमान मंदिर होऊन चक्रधर पेट्रोल पंप जवळ पदयात्रेचे समापन करण्यात आले . दरम्यान उमेश कुंभलकर व  मनोज काकडे मित्र परिवार द्वारे पालखी पदयात्रे चे फुलाच्या वर्षाने ,  बिस्कीट , अल्पोहार  , चाय वितरण करुन जोरदार स्वागत केले . पालखी पदयात्रेत परमात्मा एक दांडपट्टा निमखेडा च्या खेळाडुंनी आप आपले कराटे , कला , नृत्य सादर केले . पालखीत सहभागी झालेल्या महिलांनी फुगडी करुन आनंद उत्सव साजरा करीत पालखी व दिंडी पदयात्रा श्री क्षेत्र धापेवाडा कडे चारचाकी वाहनाने रवाना झाली।

      या प्रसंगी काद्री क्षेत्रातील जन प्रतिनिधी जिल्हा परिषद सदस्या , कांद्री ग्रामपंचायत माजी सरपंच , माजी उपसरपंच , माजी ग्राम पंचायत सदस्य , चंद्रशेखर बावनकुळे , शिवाजी चकोले , योगराज आकरे , वामन देशमुख , राजेश  पोटभरे , विलास घारपिंडे , सतीश झलके , सह गजानन महाराज मंदिर कमेटी चे पदाधिकारी व भक्तगण सह कांद्री गावातील महीला पुरुष नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .