बहुजन समाज पार्टी पदाधिकारी व गणमान्य व्यक्ती द्वारा १० वी पास विद्यार्थ्यींनींचे अभिनंदन!

 

तालुका प्रतिनिधी चिमूर

      इयत्ता १० वी बोर्ड शालांत परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला.या परिक्षेत चिमूर तालुक्यातील बऱ्याच विद्यार्थ्यांना उत्तम गुण घेऊन उत्तीर्ण होण्यास यश आले.

        यापैकी राष्ट्रीय विद्यालय चिमूरच्या कुमारी अरसिया नोविद शेख हिला १० वी बोर्डाच्या शालांत परीक्षेत ७३ पाईंट २० टक्के गुण प्राप्त झाले तर भैय्यूजी महाराज विद्यालय चिमूरच्या कुमारी तनिष्या सुरेश मेश्राम हिला ८७ पाईंट ६० टक्के गुण प्राप्त झाले.

            यामुळे बहुजन समाज पार्टी चिमूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष महेंद्र बारसागडे,उपाध्यक्ष सचिन लभाने,धर्मदास गेडाम चंद्रपूर जिल्हा माजी बसपा प्रभारी तथा माजी सरपंच येरखेडा,नेहरू विद्यालय चिमूरचे माजी प्राध्यापक सहारे सर,सावित्रीबाई फुले विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल रामटेके सर यांच्यासह आदींनी,कुमारी तनिष्या सुरेश मेश्राम व कुमारी अरसिया नोविद शेख यांच्या घरी जाऊन त्यांचे फुलगुच्छा द्वारे अभिनंदन केले आणि त्यांना उज्वल भविष्याच्या शुभेच्छा प्रदान केल्यात.