नंदलाल पाटील कापगते विद्यालयाचा निकाल 94.35%…

नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले

     साकोली येथील नंदलाल पाटील कापगते विद्यालयाचा मार्च 2023 ला घेण्यात आलेल्या दहावीचा निकाल 94.35 टक्के लागलेला असून दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम ठेवली आहे. यावर्षी 177 विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते त्यापैकी 167 विद्यार्थी उत्तीर्ण झाले . प्रथम क्रमांक अश्लेषा प्रकाश कापगते 91.20%, द्वितीय क्रमांक रिया ताई अण्णा कापगते 91%, तृतीय क्रमांक सानिया कैलास गहाणे 88.20%, चतुर्थ क्रमांक चोकेस श्रीकिसन फुंडे आणि जयश्री अविनाश मस्के या दोघांनीही 87.20% गुण प्राप्त केलेले आहेत. प्राविण्यश्रेणीत 47 विद्यार्थी, प्रथम श्रेणीत 48 विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत 37 विद्यार्थी ,तृतीय श्रेणीत पाच विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

          उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन विद्यालयाचे मुख्याध्यापक के एस डोये ,शिक्षक डी डी तुमसरे, के एम कापगते, डी आर देशमुख, आर बी कापगते ,आर व्ही दिघोरे, यु एन कटकवार इत्यादी सर्व शिक्षकांनी अभिनंदन केलेले आहे.