गोविंदपुर व करजगावला जोडणारा नदीवरील पुल उंच कधी होणार?  — अजून किती जीव बळी द्यायचे?

 

 कैलास गजबे- करजगाव..

        चांदुरबाजार तालुक्यातील गोविंदपुर या ठिकाणी बहुरडा नदीवरील पुल हा पायल्या टाकुन बनविला आहे.

        पुल बनविण्याला २० ते २५ वर्ष झाले आहे.पुलाच्या पायल्या ह्या पुर्णपणे मातीने बुजल्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यात नदीला पुर आला कि त्या पुलाच्या वरुन पाणी वाहते.त्यामुऴे इकडचे नागरीक इकडे व तिकडचे नागरीक तिकडे राहतात.जोपर्यंन्त नदीचे पाणी कमी होत नाही तोपर्यंत शाळेतील विद्यार्थ्यांना व नागरिकांना ताटकळत बसावे लागते.

       कारण गोविंदपुर येथील मुला मुलींना शिक्षण घेण्याकरीता करजगाव येथे जावे लागते.तसेच गोविंदपुर येथील नागरिकांना करजगाव येथे सरकारी दवाखाना,तलाठी कार्यालय,बॅक,पोस्ट आॅफिस,पशु दवाखाना,भाजीपाला मार्केट,खाजगी दवाखाने हे सर्व करजगावात असल्यामुळे गोविंदपूर येथिल‌ नागरिकांना नेहमी करजगाव येथे जावे लागते.

     याच पुलावरुन गोविंदपूर येथील‌ दोन व्यक्ती पुरामध्ये वाहुन गेले.जर पुल उंच असता तर त्या दोन व्यक्तींना आपला जिव गमवावा लागला नसता. अनेकवेळा गोविंदपूर येथिल‌ नागरिकांनी पुल उंच करण्याची गरज आहे असे अनेकवेळा सांगीतले.

      परंतु आजपर्यंत कोणीच या पुलाकडे लक्ष दिले नाही. तरी या नदीवरील पुलाला उंच करावे,पुल उंच झाला तर शाळेतील विद्यार्थ्यांना व गावातील नागरिकांना नदीच्या पुराचे पाणी कमी होण्याची वाट पाहत बसावे लागणार नाही व कोणत्याही नागरीकांना आपला जिव गमवावा लागणार नाही.

      पुल उंच झाल्यामुळे पुलावरुन येणे जाणे सुरु राहील तरी या पुलाकडे लक्ष द्यावे अशी गोविंदपूर व करजगाव येथिल‌ नागरिकांची मागणी आहे.