रिपाई (आठवले) २८ मे ला शिर्डी येथे होणाऱ्या अधिवेशना बाबत ८ में ला महत्वपूर्ण बैठक.. — गडचिरोली इंदिरा गांधी चौक येथील रेस्ट हाऊस बैठकीचे स्थळ..

दखल न्यूज भारत

विजय शेडमाके

       रिपाई (आठवले) गटाचे गडचिरोली जिल्हा अध्यक्ष श्री. मेघराज गुटखे यांच्या नेतृत्वात गडचिरोली इंदिरा गांधी चौकातील रेस्ट हाऊस येथे महत्त्वपूर्ण बैठक ८ में ला आयोजित केली आहे.

        या बैठकीमध्ये अतिक्रमित जमिनीच्या संदर्भात व पट्टेवाटप बाबत चर्चा होणार आहे.

       28 मे ला शिर्डी येथे होणाऱ्या अधिवेशनात जास्तीत जास्त उपस्थित दर्शविण्यासाठी गडचिरोली जिल्हा रिपाई गटातील पदाधिकारी व कार्यकर्ते या बैठकीला आवर्जून उपस्थित राहावे यासंबंधाने श्री.मेघराज गुटखे यांनी कार्यकर्त्यांना विनंती केली आहे.