आरमोरी शहर बनला अवैध धंद्यांचा ‘गडकिल्ला’… — नवीन ठाणेदार? … — जिल्हा पोलिस अधीक्षक लक्ष देणार का?

ऋषी सहारे

संपादक

       गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी शहरात अवैध धंद्यांना ऊत आले असून शहराच्या विविध ठिकाणी दारूचा महापुर,अवैधरित्या नकली तंबाखूची विक्री व इतर धंदे उदयास आले असल्याने एकप्रकारे आरमोरी शहर अवैध धंद्यांचा ‘गडकिल्ला’ बनला आहे,अशाच प्रकारचा जनमानसात चर्चेला ऊत आला आहे.

        याच बरोबर संबंधित विभाग निद्रावस्थेत गेले की काय?असा प्रश्न नागरिकांना निर्माण झाला आहे.

           जिल्ह्यात १ एप्रिल १९९३ रोजी दारू बंदी करण्यात आली.मात्र या निमित्ताने अवैध धंदे करणारे उदयास आले.संपूर्ण जिह्यात  दारू बंदी ही नावापुतीच झाली असल्याचे वास्तव  हल्ली दिसून येत आहे.अशातच आरमोरी शहर अवैध धंद्याचे माहेरघर झाले  आहे.

        आरमोरी शहरातील टिळक चौक,बाजारपेठ(बाजारटोली), टेलिफोन टॉवर,टोली बर्डी, ठवरी मोहल्ला,गायकवाड चौक व काळागोटा या ठिकाणी अवैधरित्या देशी, विदेशी,गावठी मोहफुलाची दारू व त्यातच ग्राहकांच्या मागणी नुसार थंडीगार बिअर मिळण्याची एकमेव स्थाने असल्याची वार्ता जनमानसात आहे.

       यातील टेलिफोन टॉवर व टोली(बर्डी) येथील दारूचा मुख्यसूत्रधार असल्याची खमंग चर्चा सर्वत्र सुरू आहे.सदर वार्डात गेले असता दारूची दुर्गंधी सर्वत्र पसरलेली दिसून येते.अवैधरित्या दारू विक्रेत्यांमध्ये महिला राज असल्याने तळीरामांचा पिण्याचा आणखी जास्तीत जास्त कल वाढलेला दिसून येतो.

     दिवसागणिक रोजी-रोटी कमावणारे नशेच्या आहारी गेल्याने व संबंधित विभागाच्या सहकार्याने दारू विक्रेते मालामाल तर पिणारे कंगाल असे दिसून येत आहेत.

           आरमोरी शहराच्या ३० ते ४० फूट अंतरावर असलेल्या एका पानटपरीच्या आड अवैधरित्या वापरला जाणारा तंबाखू मजा व ईगलचा संपूर्ण शहरात पुरवठा करणारा आरमोरीतील सिने अभिनेता नावाचा असल्याची खमंग चर्चा जनमानसात सुरू आहे.

        शहरात अनेक अवैधरित्या धंद्याचे सुर प्रशासकीय यंत्रणेतून चुप्पी साधून आमच्या कार्यक्षेत्रात राम राज्य सुरू असल्याचे भासवंतांना दिसून येत असल्याने जनमानसात नवल वाटत आहे.

        अशातच अवैधरित्या चालणाऱ्या धंद्यांमुळे आरमोरी शहराची प्रतिमा मलिन होत आहे.जोपर्यंत अवैधरित्या धंदे करणाऱ्यांविरोधात धडक मोहीम राबवली जाणार नाही.तोपर्यंत शहराची प्रतिमा मलिन होतच राहणार.

         शाहरुखचे चित्रपट राहुल नावांनी सुपरहीट झालेत.अशाच नावाचे लोक आरमोरी मध्ये व्यवसाय करून,जो बोलेल त्याची जीबकाटू अशीही धमकी दिली जात आहे.यासाठी अवैधरित्या धंदे करणाऱ्यांचे मुसक्या आवळणे गरजेचे असल्याचे सर्वसामान्य नागरिकांतून सूर निघू लागले आहेत.

        संपुर्ण आरमोरी शहराची जणीवपूर्वक माहिती घेऊन अवैध व्यावसायिक व त्यांना मदत करणारे अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची जन मानसातील मागणी आता जोर धरू लागली आहे.

      या पूर्वी ठाणेदार काळबांडे यांनी आपल्या कारकीर्दीत सर्व कार्यभार सुव्यवस्थित सांभाळला,परंतु नवीन ठाणेदार व येथील पिएसआय हे सुव्यवस्था कडे दुर्लक्ष करून नेमके काय करतात?हेच जनतेला कळेनासे झाले आहे. 

        आरमोरी शहर व आरमोरी ठाण्यात मोडणाऱ्या सर्व भागात मोठ्या प्रमाणांत अवैध्य धंदे चालत असून या अवैध धंद्यातंर्गत कोण कोणास जास्त मदत करीत आहे हे शोधून काढणे महत्वाचं आहे.

      शा्सन-प्रशासन स्तरावर सर्व सुरळीत असल्याचे दाखविले जात असले तरी स्थानिक ठिकाणी वाम मार्गाने जोरदार कमाई केली जात असल्याचे जनमानसात बोलल्या जात आहे.

        आरमोरी पोलिस स्टेशन अंतर्गत अवैध धंद्यातंर्गत व्यवसायीका विरोधात मोहीम राबवून त्यांच्या मुसक्या आवळतील काय आणि जिल्हा पोलिस अधीक्षक हे आरमोरी तालुक्यातील जनतेला शांत झोपू देतील काय?हा प्रश्न आहे.