डुमरी मेहदी रोड लगतच्या शेत शिवारातुन गव्हाचे २२ कट्टे चोरांनी केले लंपास.. — प्रत्येकी ६० किलो भरतीचे.. — एकुण किमत २४ हजार २०० रूपयाचा माल.

कमलसिंह यादव 

  प्रतिनिधी

पारशिवनी : – पारशिवनी तालुक्यातील डुमरी मेहंदी रोड लगतच्या शेत शिवारात हॉरवेस्टर ने काढलेला गहु खाली प्लॉट वर ठेवले होते.यातील गव्हाचे २२ कट्टे चोरट्यांनी चोरुन नेले असल्याची धक्कादायक घटना घडली.

       सदर प्रत्येक कट्ट्यात ६० किलो प्रमाणे गहू भरलेले होते.चोरुन नेलेल्या मालाची एकूण किंमत २४ हजार २०० रूपये आहे.

     मुद्देमाल चोरी केल्याने अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून कन्हान पोलिस पुढील तपास करित आरोपीचा शोध घेत आहे. 

      तकरारदार शेतमालक श्री. अभिमन दौलत डोगरे वय ६० वर्ष हे शेतीचे काम करित असुन त्यांची दिड एकर शेती डुमरी शिवारात मुकेश यादव यांचे शेताला लागुन मेहदी गावाला जाणा-या रोड वर असुन शेतामध्ये गव्हाचे पिक घेतले होते.

      पिकाची हारवेस्टरने मशिन ने कापनी करुन २२ कट्टे प्रत्येकी ६० किलो प्रमाणे एकुण १३२० किलो गेहु असे काढून घरी न आणता गावाला लागुन असलेल्या खंडेलवाल यांचे खाली प्लाट वर ठेवले होते.

      याच प्लाॅटवर गावातील लोकांनी गेहु ठेवल्याने अभिमन डोगरे यांनी सुद्धा गव्हाचे २२ कट्टे (दि.२९) मार्च २०२३ ला सायंकाळी ७ वाजता प्लास्टिक ताळपत्री झाकुन व दोरीने बांधुन ठेवले होते व त्यांची देखरेख होती.

      २ एप्रिल ला रात्री ९ वाजता गव्हाची पाहनी करून जेवन करुन झोपलो. सोमवार(दि.३) एप्रिल ला सकाळी ६ वाजता भाचा गोपीचंद श्रीरामे याने घरी येऊन म्हणाला तुम्ही गहु कोणाला विकले का?,तेव्हा मी गहु कोणालाच विकले नाही असे म्हटले असता त्यांच्या भाचाने तुमचे गहु प्लॉट वर दिसत नाही म्हटल्याने गहु ठेवलेल्या प्लॉटवर पाहले तर ताळपत्री बाजुला फेकफाक करून गव्हाचे कट्टे अज्ञात चोरट्यांनी नेल्याचे दिसुन आले. 

       गव्हाच्या कट्ट्या संबधाने आजुबाजुला विचारपुर केली.मात्र सुगावा लागला नाही.

        यावेळी शेतमालक अभिमन डोंगरे यांनी कन्हान पोलीस स्टेशन गाठुन गहू कट्टे चोरी बाबत तक्रार दिल्याने,अपराध क्र. १६२/२०२३ कलम ३७९ भादंवि अन्वये अज्ञात चोरा विरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिस स्टेशनचे थानेदार प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनात ए.एस.आय. सुर्यभान जळते पुढील तपासान्वये आरोपीचा शोध घेत आहे.