बंधाऱ्याचे २२ तरापे गेले चोरीला.. — ग्रामपंचायत बोर्डा अंतर्गत नाल्यावरील घटनाक्रम..  

कमलसिंह यादव 

  प्रतिनिधी

      ग्रामपंचायत बोर्डा अंतर्गत नाल्यावरील बंधाऱ्याला लावून असलेले २२ लोखंडी तरापे चोरुन नेले असल्याची घटना घडली.

          नरेंद्र गोंविंदराव ठाकरे रा. बोरडा गणेशी ग्रामपंचायत उपसरपंच यांना ग्रामपंचायत चपराशी यांनी फोन करुन सांगीतले की नाल्याचे पाणी थांबविण्यासाठी बंधाऱ्याला लावलेले जुने वापरते लोखंडी तरापे दिसुन येत नाही.

        तरापे चोरीच्या माहिती दिल्यावरुन फिर्यादी उपसरपंच यांनी ग्रामपंचायत सरपंच,ग्रामसेवक व इतर सदस्य यांच्या सोबत घटनास्थळी जावुन पाहिले असता नाल्याचे पाणी थांबविण्यासाठी बंधा-याला लावलेले लोंखडी तरापे जुने वापरते २० नग किंमती अंदाजे ५०० रु प्रती नग प्रमाणे एकुण १०,००० /- रुपयाचा मुद्देमाल अज्ञात चोराने चोरुन नेला असल्याचे दिसून आले..

      सदर प्रकरणी फिर्यादी उपसरपच नरेन्द ठाकरे यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. कन्हान येथे अज्ञात आरोपी विरुध्द कलम ३७९ भादंवि कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. 

       आरोपीचा शोध घेणे सुरू असून गुन्ह्याचा पुढील तपास पो. नि.मकेश्वर यांचे मार्गदर्शनात पो. हवालदार प्रवीण चव्हाण हे पुढील तपास करीत असून आरोपीचा शोध घेत आहेत.