संतभुमी अलंकापुरीत भगवान महावीर जयंती निमित्त भव्य शोभायात्रा…

दिनेश कुऱ्हाडे

  प्रतिनिधी

आळंदी : जगाला अहींसा व शांततेचा संदेश देणारे भगवान महावीर यांची जयंती संतभुमी अलंकापुरीत मोठ्या उत्सहात संपन्न झाली. भगवान महावीरांच्या प्रतिमेची गावातून सवाद्य शोभायात्रा काढण्यात आली. जैन बांधव मोठ्या संख्येने या शोभायात्रेत सहभागी झाले होते. जैन स्थानकापासून मिरवणूकीस सुरुवात करण्यात आली महाद्वारातून, पितळी गणपती, प्रदक्षिणा रोड, भैरवनाथ चौक, पोलिस स्टेशनमार्गी जैन स्थानकावर शोभायात्रेचा समारोप झाला.

यावेळी आळंदी पोलिस स्टेशनच्या वतीने पोलिस निरीक्षक रमेश पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. मिरवणूक जैन स्थानकात आल्यानंतर जैन संघाचे अध्यक्ष आणि माजी नगराध्यक्ष सुरेशकाका वडगावकर यांनी भगवान महावीरांच्या प्रतिमेचे पुजन करुन जगाला मानवतेचा संदेश देणारे भगवान महावीरांचे विचार आचरणात आणण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष सागर बोरुंदीया, ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, सतीष चोरडिया, काँग्रेसचे अध्यक्ष नंदकुमार वडगावकर, राजेंद्र धोका, सचिन बोरुंदिया, राजेंद्र लोढा, दिलीप नहार, सागर बागमार, शांतीलाल चोपडा, प्रमोदकुमार बाफना, शाम कोलन, रमेश नवलाखा आदी समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.