शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी..
जगातल्या इतिहासात अजरामर असलेले संत रविदास यांच्या जयंतीनिमित्तचा कार्यक्रम चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा डोमा येथे आनंदमय वातावरणात संपन्न झालाय.
उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते संत रविदास यांच्या प्रतिमेला पुष्पहार व पुष्पगुच्छ अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
मौजा डोमा येथे झालेल्या संत रविदास जयंतीच्या कार्यक्रम निमित्ताने भेट देण्यात आली असता काही पदाधिकाऱ्यांचे कार्यक्रम आयोजकांतर्फे स्वागत करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाच्या निमित्ताने वंचित बहुजन युवा आघाडिचे जिल्हाध्यक्ष शुभम मंडपे व श्रीकृष्ण झील्लारे,संजय शिवरकर,कवडू निकसर यांनी उपस्थितांना संत रविदास यांच्या जिवन कार्यावर मार्गदर्शन केले..



