शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चिमूर :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,समाज कल्याण आयुक्तालय,महाराष्ट्र राज्य,पुणे यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय क्रीडा व कला अविष्कार स्पर्धा २०२५–२६ मध्ये साहाय्यक आयुक्त कार्यालय,चंद्रपूर अंतर्गत येणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा,चिमूर येथील विद्यार्थिनींनी नेत्रदीपक यश संपादन केले आहे.
या स्पर्धेमध्ये भूमिका अभिनय (नाट्य अभिनय) या प्रकारात विद्यार्थीनी उत्कृष्ट असे नाट्यप्रकाराचे सादरीकरण करत आपल्या उत्कृष्ट अभिनय कौशल्याने परीक्षक व प्रेक्षकांची मने जिंकली.
चंद्रपूर जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त मोहतुरे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली सादर करण्यात आलेल्या या भूमिका अभिनयाने राज्यस्तरावर प्रथम क्रमांक पटकावून शाळेच्या यशात मानाचा तुरा रोवला आहे.
या यशामागे शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुनिता खोब्रागडे यांचे प्रेरणादायी नेतृत्व तसेच शाळेतील शिक्षकवृंदांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले…
विद्यार्थिनींना श्रीमती प्रिया बोरकर,श्री.विनय खापर्डे,श्री.दत्तात्रय पुलेनवार,श्री.सचिन भरडे,श्री.राजरत्न गजभिये,श्रीमती अनुराधा महाजन,श्री.पंकज काळे,श्रीमती जोत्सना नेऊलकर व श्रीमती घ्यार
यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
या उज्वल यशाबद्दल माननीय प्रादेशिक उपायुक्त,समाज कल्याण कार्यालय नागपूर,श्री.प्रसाद कुलकर्णी यांनी यशस्वी विद्यार्थिनींचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
तसेच साहाय्यक आयुक्त कार्यालय चंद्रपूर येथील विनोदज मोहतुरे यांनीही विद्यार्थिनींच्या कलेचे व मेहनतीचे विशेष कौतुक केले.
या राज्यस्तरीय यशामुळे शाळेच्या लौकिकात भर पडली असून इतर विद्यार्थ्यांना देखील कला व अभिनय क्षेत्रात प्रोत्साहन मिळाले आहे.विद्यार्थिनींच्या या घवघवीत यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



