भाविकदास करमनकर
तालुका प्रतिनिधी धानोरा
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना व जिल्हा वार्षिक निधी योजना अंतर्गत सन 2023 – 24 या वर्षात अभिसरणातून अंगणवाडी क्रमांक 3 च्या इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले.
या इमारतीचा उद्घाटनाचा सोहळा दिनांक 3/2/ 2026 रोजी पार पडला.या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री.शिवप्रसाद गवर्ना सरपंच ग्रामपंचायत मुरूमगाव यांचे हस्ते करण्यात आले.
त्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.एस.एम.वानखेडे संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती धानोरा हे होते.
प्रमुख अतिथी म्हणून सौ.लताताई पुंगाटी माजी जिल्हा परिषद,श्री.अजमन रावठे माजी सभापती पंचायत समिती धानोरा,श्री.लाकडे विस्तार अधिकारी,जयंत मेश्राम ग्रामपंचायत अधिकारी मुरूमगाव,उपसरपंच श्री.मथनूराम मालिया,ग्रामपंचायत सदस्य श्री.अभिजीत मेश्राम,तिवारीलाल भोयर,चारुलता मार्गीया,रेखाताई देहारी,कृष्णाबाई भक्ता,गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री.शिवनाथ टेकाम,वसंत कोलीयारा,बैसाकुराम कोटपरिया ग्रामकोश समिती मुरूमगाव,खेमराजजी खोब्रागडे,मुनीरजी शेख,आनंदजी आत्राम,सोनलताई वाघाडे अंगणवाडी पर्यवेक्षक,उषा तरमनवार अंगणवाडी कार्यकर्ता उपस्थित होते.
श्री.वानखेडे संवर्ग विकास अधिकारी यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की,0 ते 3 व 3 ते 6 या वयोगटातील मुला मुलींना बाल संस्कार घडविण्याचे मुख्य केंद्र हे अंगणवाडी आहे.त्यामुळे या वयोगटातील सर्व बालकांना घरी न ठेवता अंगणवाडीमध्ये आणून सोडावे,जेणेकरून त्यांना चांगल्या सवयी लागतील व प्राथमिक शिक्षणाची ओढ निर्माण होईल.
संपूर्ण सुविधा युक्त असणाऱ्या अंगणवाडीला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात गुण असल्याने सदर अंगणवाडीचे इमारत बांधकाम त्वरित पूर्ण करून त्याचा उद्घाटन सोहळा पार पाडण्यात आला असे मत,श्री.शिवप्रसाद गवर्ना सरपंच यांनी व्यक्त केले.



