“घर तिथे संविधान” संकल्पाचा कराडमध्ये शुभारंभ….

प्रितम देवाजी जनबंधु

        संपादक 

             आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानच्या वतीने आणि प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते यांच्या पुढाकारातून सन 2024 मध्ये राबिवले जात असलेल्या घर तिथे संविधान या संकल्पचा शुभारंभ कराड येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून करण्यात आला.

     “घर तिथे संविधान” हा ‘संकल्प’ 4 जानेवारी 2024 ते 26 नोव्हेंबर 2024 या कालावधीत राबवला जाणारा असून यामध्ये महाराष्ट्रातील जवळपास 100 तालुक्यातील 500 गावांमध्ये पोहोचून संविधानाबाबत जनजागृती आणि संविधानाची माहिती यावेळी देण्यात येणार आहे. 

             या संकल्पाचा शुभारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत कराड येथील भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन राजकुमार लादे यांनी केले. 

            यावेळी आदर्श माता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते, माध्यमिक शिक्षक संघाचे नेते राजकुमार लादे, ज्येष्ठ पत्रकार अजिंक्य गोवेकर, सामाजिक कार्यकर्त्या पत्रकार विद्या मोरे, अण्णाभाऊ साठे सामाजिक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष श्रीकांत कांबळे, आरसीपी कमिटीचे, अध्यक्ष इमरान मुजावर, पाडळी केसे ग्रामपंचायतचे सदस्य आनंदा बडेकर, आदर्श माता प्रतिष्ठानचे संपतराव मोहिते, भीम आर्मी सामाजिक संघटनेचे सातारा जिल्हा निरीक्षक अशोक मस्के, माजी जिल्हा परिषद सदस्य सविनय कांबळे, राष्ट्रीय काँग्रेस ओबीसी विभागाचे उमरफारूक सय्यद, एडवोकेट स्वप्निल भिसे, माजी पंचायत समिती सदस्य अनिल सावंत, जयवंत माने, बहुजन समता पार्टीचे सातारा जिल्हा अध्यक्ष रामभाऊ दाभाडे, दलित महासंघाचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष रमेश सातपुते, काँग्रेसचे अनुसूचित जाती विभागाचे कराड तालुका उपाध्यक्ष विजय वायदंडे, कृष्णत्त मोहिते, आदर्श माता प्रतिष्ठानचे पदाधिकारी विजय गायकवाड सह बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

              स्वागत प्रास्ताविक राजकुमार लादे यांनी केले तर आभार विश्वास मोहिते यांनी मानले.