भद्रावती शिक्षण संस्था द्वारा,”रन फॉर महाराष्ट्र,मॅराथॉन स्पर्धाचे आयोजन..

    उमेश कांबळे

तालुका प्रतीनिधी भद्रावती

          भद्रावती शिक्षण संस्था,हे नाव शिक्षण,संशोधन,क्रिडा आणि सामाजिक क्षेत्रातही आपल्या कर्तृत्वाने अर्धशतकापासून सुपरिचित आहे.उपरोक्त क्षेत्रात संस्था दरवर्षी अनेक कार्यकमाचे आयोजन करीत असते.

           भद्रावतीकरांच्या सुदृढ आरोग्याच्या व राष्ट्र निर्मितीच्या उ‌द्देशाने भद्रावती शिक्षण संस्था मागील काही वर्षापासून मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन करीत आहे..

        मागील वर्षात “रन फॉर युनीटी”, “रन फॉर डॉटर” व “रन फॉर फेंडशिपचे” आयोजन संस्थेद्वारे केले होते व भद्रावती परिसरातील नागरीकांकडून तिन्ही स्पर्धांना उत्तम प्रतिसाद मिळाला होता.

      यावर्षी भद्रावती शिक्षण संस्था,भद्रावतीने रविवार दिनांक ७ जानेवारी,२०२४ ला “रन फॉर महाराष्ट्र” या बिरुदाने मॅराथॉन स्पर्धा आयोजन केले आहे.ही स्पर्धा यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणातून सुरवात होवून गवराळा गेट व परतीचा मार्ग राहणार आहे.

        या मॅराथॉन स्पर्धेला वरोरा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी नाओमी साटम हे हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेची सुरवात करणार आहेत.

        या मॅराथॉन स्पर्धेला भद्रावतीतील नागरीक,शाळा,महाविद्यालये, यांना प्राचारण करण्यात आले आहे.आपल्या महाराष्ट्राच्या प्रगतीकरीता व उत्तम आरोग्याकरीता लहानापासुन तर थोरांपर्यंत महाराष्ट्रीयन वेषभुषेत सर्वांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन भद्रावती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मान डॉ.विवेक नि. शिंदे यांनी केले आहे.