दसऱ्यापासून महाराष्ट्रात ‘युवा संघर्ष यात्रा’ काढणार : आ.रोहित पवार 

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक

        पुणे : महाराष्ट्रातील तरुणांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार हे मैदानात उतरणार आहेत. स्पर्धा परीक्षा देणारे युवा, डिग्री असूनही काम नसणारे विद्यार्थी, आर्थिक अडचण असलेले विद्यार्थी, बेरोजगार तरुण या सर्व समस्यांसाठी महाराष्ट्रात ‘युवा संघर्ष यात्रा’ काढणार असल्याची माहिती आ.रोहित पवार यांनी दिली आहे

           राज्यातील तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी काढण्यात येणाऱ्या यात्रेविषयी माहिती देताना रोहित पवार यांनी,”गेल्या काही दिवसात राजकारण कोणत्या लेव्हेलला गेले हे आपण पाहिले आहे. भाजपने शिवसेना, राष्ट्रवादी फोडली. तरी आम्ही भूमिका न बदलता लढत राहिलो, अनेक आंदोलन करून फक्त शब्द मिळाले, पणं अडचणी सुटल्या नाहीत. माझ्या वाढदिवसानिमित्त मी बाहेर होतो, पणं माझ मन व्यथित होतो काल मी शरद पवारांना भेटलो, त्याचे विचार आणि मार्गदर्शन घेतल. युवकांशी संपर्क साधला जावा यासाठी यात्रा काढणार असल्याचे त्यांनी म्हटले.

          पुढे बोलताना रोहित पवार यांनी,” ही यात्रा पुण्यापासून सुरु करणार आहे तर शेवट नागपूर होणार आहे. ही यात्रा पायी यात्रा असणार आहे., तर यात्रेत ८२० किलो मिटर अंतर असून ही यात्रा २४ ऑक्टोबरला म्हणजेच दसऱ्यापासून सुरु होणार आहे. दिवसाला २७ ते २४ किलोमीटर चालणार असल्याची माहिती दिली.

           यात्रेविषयी सांगताना रोहित पवार म्हणाले,”पुण्यातून तुळापूरला जाऊन छत्रपती संभाजीमहाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन करणार आहे. ही यात्रा रोहित पवार आणि राष्ट्रवादीची नसणार ही यात्रा फक्त युवा तरुणांची असणार असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे. या यात्रेत फक्त पवार साहेब यांचा फोटो असणार आहे. तरुण लोकांचे ऊर्जा स्थान पवार साहेब आहेत त्यामुळे या यात्रेत प्रवास करुन आम्ही तरुणांचे सगळे मुद्दे एकत्र करून येत्या हिवाळी अधिवेशनात आम्ही मांडणार असल्याचे त्यांनी म्हटले .