मुनघाटे महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा..

 

धानोरा /भाविक करमनकर 

    धानोरा श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा संचालित श्री.जी.सी.पाटील मुनघाटे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय धानोरा येथील रासेयो विभाग व शारीरिक शिक्षण विभागा द्वारा दिनांक 21 ते 29 ऑगस्ट या कालावधीत राष्ट्रीय क्रीडा दिन महाविद्यालयात साजरा करण्यात आला डॉ किरमिरे व जेष्ठ प्राध्यापकांनी स्पर्धांचे उद्घाटन 28 /8 2023 ला केले. यादरम्यान क्रिकेट रोप जम्पिंग लंगडी लिंबू चमचा वॉकरेस तथा उंच उडी दिनांक 28.8 .2013 ला घेण्यात आल्या व दिनांक 28.8 2023 ला चेस स्पर्धा मॅरेथॉन, स्याक स्पर्धा घेण्यात आल्यात.

      दिनांक 29.8.2023 ला फिट इंडिया शपथ घेण्यात आली,या स्पर्धेमध्ये बीए प्रथम च्या चमूने क्रिकेट स्पर्धा 9 गड्यानी जिंकली या स्पर्धेत परीक्षण प्राध्यापक वाळके प्राध्यापक नितेश पुण्यप्रेड्डीवार व प्राध्यापक देवानंद गोरडवर यांनी केली. 

          रोप जम्पिंग या क्रीडा प्रकारात कुमारी सुहानी पदा प्रथम क्रमांक तर युतेश्वरी गावडे द्वितीय तर कुमारी श्रद्धा मोहूर्ले यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला या स्पर्धेचे परीक्षण प्राध्यापक पंढरी वाघ व प्राध्यापक नितेश पुण्यप्रेड्डीवार यांनी केले. लंगडी या क्रीडा स्पर्धेत कुमारी श्रेया कुमोटी प्रथम कुमारी भाग्यश्री नैताम द्वितीय तर तृतीय क्रमांक सुहानी पदा यांनी पटकावला लेमन रेस या स्पर्धेत शुभागना मोटघरे कुमारी हिना गावतुरे कुमारी श्रद्धा मोहुर्ले यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक पटकावला.परीक्षण डॉ.विना जमबेवार डॉ पठाड़े यानी केले.

        तसेच वॉक कॉम्पिटिशन स्पर्धेत कुमारी शुभागना मोडघरे कुमारी हिना गावतुरे कुमारी ज्योती गुरनुले यांनी अनुक्रमे प्रथम,द्वितीय,तृतीय क्रमांक प्राप्त केला.

      या स्पर्धेत परीक्षण प्राध्यापक डॉ.वाघ,प्राध्यापक डॉ.मुरकुटे प्राध्यापक तोंडरे यांनी केले.बुद्धिबळ स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यात कुंदन समरस व तुषार कोल्हे दोन स्पर्धेत पात्र ठरले.

         अंतिम सामन्यात कुंदन समरस हा स्पर्धक विजेता ठरला. तसेच मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाली या स्पर्धेत कुमारी शुभांगना मोटघरे रुशभ लडके कुमारी वृशाली फरदीया कुमारी भाग्यश्री नैताम महिला मॅरेथॉन स्पर्धेत यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाने विजयी ठरले .पुरुष मॅरेथॉन स्पर्धेत बोहरसिंग मडकाम धनीराम तुलावी ऋषभ लडके यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक प्राप्त केला या स्पर्धेत महाविद्यालयातील 70 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

        सैक स्पर्धेत विवेक शेडमाके अमीर वट्टी हेमराज तुलावी मिंट्टी तुलावी विजेते ठरली राष्ट्रीय क्रीडा दिन या निमित्ताने दिनांक 21 ते 29 ऑगस्ट या कालावधीत विविध स्पर्धेचे आयोजन प्राचार्य डॉ चव्हाण यांचे मार्गदर्शनात राष्ट्रीय सेवा कार्यक्रम प्रमुख प्राध्यापक ज्ञानेश बनसोड व प्राध्यापक संजय मुरकुटे शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख यांनी आयोजित केले सदर क्रीडा स्पर्धा व राष्ट्रीय क्रीडा दिन यशस्वी करण्याकरीता रासेयो सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ.प्रियंका पठाडे,प्राध्यापक डॉ.जी.एन. चुधरी,डॉ.पी.एन.वाघ,डॉ.पी.बी. गोहणे,प्राध्यापक गीताचंद्र भैसारे, जीवन घोरपडे,मनोज नन्नावरे, वाढनकर तसेच इतर प्राध्यापक रुंद व कर्मचारी वृंद यांनी स्पर्धा यशस्वी होण्यास सहकार्य केले.याप्रसंगी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित.