सांस्कृतिक महोत्सवातून व्यक्तिमत्व विकास – खा. सुनील मेंढे

 

प्रितम जनबंधु

संपादक 

 

भंडारा, :– काही अंशी अंगी गुण असूनही त्याला योग्य व्यासपीठ मिळत नसेल तर व्यक्तिमत्त्व विकास होत नाही. व्यक्तिमत्व विकासातून कलेची जोपासना करण्यासाठी सांस्कृतिक महोत्सव अत्यंत महत्वाचा असल्याचे मत खासदार सुनील मेंढे यांनी व्यक्त केले. केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या निर्देशानुसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून वैनगंगा-पांगोली खासदार सांस्कृतिक महोत्सव भंडारा-गोंदिया जिल्ह्यात आयोजित करण्यात आला आहे. प्रत्येक तालुका आणि तालुक्यातील विजेत्या संघाना लोकसभा स्तरावर स्वतःच्या कलागुणाला प्रदर्शित करण्याची संधी मिळणार आहे. भंडारा तालुकास्तरीय पारंपरिक नृत्य स्पर्धा, युवा आणि महिला महोत्सवाचे आयोजन 2 सप्टेंबर रोजी भंडारा येथील लक्ष्मी सभागृहात करण्यात आले होते.

       स्पर्धेचे उद्घाटन खासदार सुनील मेंढे यांच्या हस्ते केले. स्पर्धा करा मात्र एकमेकांविषयी मनात द्वेष ठेवून नाही तर खेळाडू वृत्तीने यशस्वी होण्यासाठी लढा. सांस्कृतिक महोत्सवाच्या निमित्ताने ग्रामीण भागातील युवा आणि महिलांना एक चांगले व्यासपीठ मिळाले असल्याचे यावेळी खासदारांनी सांगितले. स्पर्धेत अनेक संघानी सहभागी होत पारंपारिक नृत्याचे दर्शन घडविले. युवा आणि महिला महोत्सवातही विविध केला गुणांचे दर्शन घडले. यावेळी खासदारांनी विजेत्या स्पर्धकांना लोकसभा स्तरीय स्पर्धेत होण्याचे निमंत्रण स्पर्धक आणि नागरिकांना दिले.

             यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपा भंडारा जिल्हा प्रभारी संजयजी भेंडे, सौ.शुभांगी मेंढे, चैतन्य उमाळकर, मुकेश थानथराटे, प्रशांत खोब्रागडे, नितीन कडव, विनोद बांते, गजेंद्र फुंडे, ओम कटरे, तुषार काळबांधे, सुर्यकांत इलमे, संजय कुंभलकर, कैलाश तांडेकर, मनोज बोरकर, रोशन काटेखाये नगरसेविका साधना त्रिवेदी, सौ.चंद्रकला भोपे, सौ.वनिता कुथे, सौ.गीता सिडाम, सौ. रोशनी पडोळे, सौ.मधुरा मदनकर, आशा उईके, सौ.निखाडे ज्योती साबळे, सौ.रोहिणी आस्वले, सौ. कल्याणी निखाडे तिरपुडे, सौ.सायली ढोके, सौ.वर्षा साकुरे, निघत खान, अर्चना श्रीवास्तव, विष्णुदास हटवार, नरेंद्र बोंद्रे, अनिल चौधरी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.