14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग..

उमेश कांबळे ता प्र भद्रावती 

          तालुक्यातील कुनाडा गावात 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी घरात एकटीच असल्याची संधी साधून 37 वर्षीय इसमाने तिचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे.

          आरोपी महेश उर्फ दादु तुराणकर वय 37 वर्ष राहणार ओंकार लेआउट, भद्रावती याला भद्रावती पोलिसांनी अटक केली आहे. सदर आरोपीचा कुनाडा गावात पाळीव जनावरांचा गोठा असल्याने तो जनावरे बघण्या करीता नेहमी गावात जात येत असायचा. त्यामुळे तो गावातील सर्वांचाच परिचित होता.

         घटनेच्या दिवशी सदर आरोपी कुनाडा गावात गेला,सदर मुलगी हि घरात एकटी होती हीच संधी साधून त्याने या 14 वर्षीय मुलीचा विनयभंग केला. या बाबतची माहिती घरच्यांना होताच घटनेची तक्रार भद्रावती पोलिसात देण्यात आली. भद्रावती पोलिसांनी सदर आरोपीवर संबंधित गुन्हे दाखल करून त्याला अटक केली असुन न्यायालयात सादर केले आहे. सदर घटनेचा तपास भद्रावती पोलीस स्टेशनचे ठाणेदार बिपिन इंगळे यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक राहुल किटे करीत आहे.