काँग्रेसच्या जनसंवाद पदयात्रेच्या भव्य शुभारंभ…

अरमान बारसागडे

तालुका प्रतिनिधी 

         महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या निर्देशाने संपूर्ण राज्यभरात काँग्रेस पक्षाच्या वतीने मोदी सरकारचे अपयश चव्हाट्यावर आणण्यासाठी जनसंवाद पदयात्रा काढण्यात येणार आहे.चिमूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने या पदयात्रेचा शुभारंभ आज क्रांतिभूमी म्हणून प्रसिद्ध चिमूर तालुक्यातील वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज तफो भूमी गोंदेडा येथे पार्थना करून सुरवात करण्यात आली.

           यादरम्यान जनतेपर्यत जाऊन जनेतच्या अडचणी आणि मागण्या समजून घेत केंद्रातील भाजप आणि राज्यातील ED सरकाचे अपयश लोकांना सांगण्यात येणार आहे.

          ही पदयात्रा पहिल्या दिवशी – गोडोदा -पळसगांव -विहीरगाव -मासळ मार्गे असून तालुक्यातील युवक, महिला, शेतकरी, काँग्रेस नेते, पदाधिकारी, सर्व सेल अध्यक्ष, तालुकाध्यक्ष आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने यात सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे खनिकर्म महामंडळ माजी मंत्री तथा महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी महासचिव आ.डॉ. अविनाशभाऊ वारजूकर व ७४ चिमूर विधानसभा क्षेत्राचे समन्व्यक तथा उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश डॉ. सतिशभाऊ वारजूकर यांनी केले आहे.