दर्यापूर पतसंस्था सर्व साधारण सभा व सत्कार समारंभ संपन्न… — एक टक्का व्याजदर कमी व १०% लाभांश जाहीर…

 

युवराज डोंगरे/खल्लार

   उपसंपादक

          दर्यापुर पंचायत समिती शिक्षक सहकारी पतसंस्था दर्यापुर रं न.५०२ कडुन दरवर्षी प्रमाणे शिक्षक पतसंस्था कडुन सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार घेण्यात आला या प्रसंगी विजय पवार यांच्या अध्यक्षतेत व बळवंत वानखडे दर्यापुर विधानसभा मतदार संघ यांच्या प्रमुख उपस्थितीत सेवानिवृत्त शिक्षकांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

          सत्कार मुर्ती म्हणुन अरविंद वाघमारे माजी शिक्षण विस्तार अधिकारी, विलास पेठे विजय वानखडे धनराज चांदुरकर , धनराज साखरे ,गजानन गावंडे, विजय ठाकरे , नंदकिशोर काळमेघ, वंसत बावनकुळे, हरिदास ठाकरे , शेख मुसा, विनायक रौराळे , साहेबराव काळमेघ, छायाताई कडु , संजय गावंडे उ.श्रे.मुख्याध्यापक, रत्नप्रभा करमसिध्दे , पुष्पा खंडारे , गणेश रामेकर , गजानन जाधव , सुभाष लकडे, किशोर विधाते , साजीद सुल्लाउद्दीन नईमोद्दीन, सुभदा जाधव , मेहमुद स रोबत,श्रीमती निमा राऊत, प्रमोद चौरपगार उ.श्रे मुख्याध्यापक , अरुण राऊत, मो.हनीफ शेख हबीब यांचा सर्वांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन सुधाकर भारसाकळे ,माजी अध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती बँक अमरावती, बाळासाहेब हिॆगणीकर माजी सभापती वित्त व आरोग्य,सुनिलभाऊ डिके माजी जि.प.सदस्य, वंदनाताई करुले ,माजी जि.प.सदस्या, पंडितराव देशमुख माजी जिल्हा अध्यक्ष ,अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, अमरावती, विनोद खेडकर गटविकास अधिकारी पं.स दर्यापुर, सि.जे ढवक , सहा गटविकास अधिकारी, विरेंद्र तराळे गटशिक्षणाधिकारी ,पं.स दर्यापुर, पं.स दर्यापुर. डी.सी होले,माजी अध्यक्ष शिक्षक सहकारी बँक, श्रीकृष्ण आगे माजी सचिव, शिक्षक पतसंस्था दर्यापुर किशोर मुंदे माजी अध्यक्ष, शिक्षक सहकारी बँक ,अमरावती,सतीश वानखडे अध्यक्ष ,अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा अमरावती, राजेद्र मालोकार माजी उपाध्यक्ष, रत्नाकर करुले शिक्षक नेते, प्रकाश धजेकर, अध्यक्ष गाडगे बाबा गृहनिर्माण संस्था दर्यापुर,इर्शाद मुस्तोकोद्दीन , मधुभाऊ चव्हाण, शराफत उल्ला अध्यक्ष अखिल महाराष्ट्र उर्दु शिक्षक संघटना, सुरेश वानखडे माजी अध्यक्ष कास्ट्राईब शिक्षक संघटना, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

         दुसऱ्या सत्रामध्ये पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेस सुरुवात करण्यात आली सर्व प्रथम संस्थेच्या मय्यत सभासदांना श्रद्धांजली देऊन पतसंस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब पावडे यांनी विषयांना सुरुवात केली पतसंस्थेची निवडणूक नुकतीच झाल्यामुळे पतसंस्था प्रचारादरम्यान सभासदांना दिलेल्या आश्वासनाची सभासदांनी अध्यक्षांना व संचालकांना आठवण करून दिली यावेळी अध्यक्षांनाही प्रचारादरम्यान दिलेल्या वचननाम्याप्रमाणे सभासदांच्या मागण्यांना दुजारा देत पतसंस्थेचे दीर्घ मुदती कर्ज मर्यादा ५ लाखावरून ७ लाख करण्यात आली अल्पमुदती कर्ज 50 हजारा वरून १ लाख रुपये करण्यात आले, कर्जावरील व्याजदर ११ % वरून एक टक्का कमी करून १०% करण्यात आले व लाभांश सुद्धा वचनाम्याप्रमाणे १०% देण्याची घोषणा करण्यात आली यावेळी बऱ्याच सभासदांनी संचालक मंडळाचे आभार व अभिनंदन केले.

        विशेषता दादारावजी भोंगळे सर यांनी अध्यक्ष तथा संचालक मंडळाने यापूर्वीही पतसंस्थेत चांगले निर्णय घेतले व आजही आमसभेच्या दरम्यान वचननाम्याप्रमाणे सभासद हितांचे निर्णय घेतल्यामुळे अध्यक्ष तथा सर्व संचालकांचे भरभरून अभिनंदन करून आभार मानले.

        या कार्यक्रमास यशस्वी करण्याकरीता शिक्षक पतसंस्था दर्यापुर चे अध्यक्ष बाळासाहेब पावडे, उपाध्यक्ष विनायक चव्हाण, सचिव डी.आर.जामनिक, खजिनदार प्रशांत गहले,सर्व संचालक संजय साखरे, गजानन गणोदे,अशोक बावनेर, सुनिल स्वर्गीय, आल्हाद तराळ, संदिप कोकाटे, अ.शकील अ.हमीद, धनपाल गजभिये, राजेद्र उगले, प्रविणा कोल्हे संचालिका ,भारती राणे तसेच सर्व सदस्य गण यांनी प्रयत्न केले. तर कार्यक्रमाचे संचालन डी.आर.जामनिक व‌ आभार प्रदर्शन आल्हाद तराळ, यांनी केले