अखिल शिक्षक संघातर्फे अमरावतीमध्ये पेन्शन मार्च व जंगी सभा…

 

युवराज डोंगरे/खल्लार                         

    उपसंपादक

        जुनी पेन्शन आणि खाजगीकरण विरोधी आणि इतर प्रमुख मागण्या करिता अमरावती येथे भारत संघर्ष यात्रेचे वाशिम जिल्ह्यातून अमरावती जिल्ह्यात आगमन झाले. त्याप्रित्यार्थ अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ शाखा नांदगाव द्वारा लोणी येथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

          यवतमाळ टी पॉइंट बडनेरा येथे जिल्हा संघातर्फे ढोल, फटाकेच्या गजरात स्वागत आटोपल्या नंतर खुल्या जिप मधून यात्रेतील सहभागी राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांना आसनस्थ करून बाईक रॅलीला आरंभ करण्यात आला. रॅली जुनीवस्ती मार्गे साईनगर, नवाथे प्लॉट, राजापेठ येथे पोहचल्यानंतर राजकमल चौकात रॅलीचे मनपा शिक्षक संघटनेच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले.

            शाम चौक, जयस्तंभ चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे मान्यवरांचे हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर येथील पूर्णाकृती पुतळ्याला हारार्पण करून पुढे गर्ल्स हायस्कूल चौक ला वळण घेऊन रॅली प.स.भातकुली सभागृह शिक्षणाधिकारी कार्यालय येथे विसर्जित होऊन सभेमधे रूपांतरित झाली. 

            सभेच्या अध्यक्ष स्थानी देविदास बस्वदे अध्यक्ष अ.म. प्रा.शि.संघ तर प्रमुख अतिथी म्हणून हरगोविंदन, कोषाध्यक्ष अ.भा.प्रा.शि.संघ दिल्ली, बसवराज गुर्रिकर दक्षिण प्रभारी, सिमा माथूर सरचिटणीस वूमेन नेटवर्क दिल्ली, रमा देवी उपाध्यक्ष अ.भा.प्रा.शि.संघ तामिळनाडू, नागराज संयुक्त चिटणीस कर्नाटका, कल्याण लवांडे सरचिटणीस अ.म.प्रा.शि.संघ, महेश देशमुख, दिगंबर जगताप उपाध्यक्ष अ.म.प्रा.शि.संघ , किरणजी पाटील राज्य उपाध्यक्ष तथा विदर्भ विभाग प्रमुख, संगीता देव, गजानन चौधरी जिल्हाध्यक्ष, सुभाष सहारें जिल्हा सरचिटणीस, सुनीता पाटील जिल्हाध्यक्ष महिला, संजय साखरे कार्याध्यक्ष, अशोक चव्हाण कोषाध्यक्ष, नीलकंठ यावले ज्येष्ठ मार्गदर्शक, मनोज चोरपगार, संजय नागे, संजय वाटाणे, विजय चोरपगार, पंकज गुल्हाणे, प्रभाकर झोड, मंगेश खेरडे, नितीन कळंबे, जावेद जोहर, वसीम फरहत, मंचाकवर उपस्थित होते.

             शिक्षक समस्या सोडविण्यासाठी अखिल संघ नेहमी अग्रेसर असल्याचे व शिक्षकांचे पाठीशी खंबीर पणे संघटना नेहमी उभी राहील असे आपल्या प्रास्ताविकात किरण पाटील यांनी मत व्यक्त केले.

           5 सप्टेंबर शिक्षकदिनी देशातील चार राज्यातून सुरू झालेली यात्रा आंतरराष्ट्रीय शिक्षक दिंनी 5 ऑक्टोबर ला दिल्लीला पोहचेल असे अध्यक्ष देविदासजी बसवदे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले. 

          शिक्षकांच्या खालील प्रमुख मागण्या व जनजागृती करिता या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. जूनी पेंशन योजना लागू करावी. शिक्षण सेवक योजना बंद करून कायमस्वरूपी शिक्षक नेमण्यात यावे. नविन शिक्षण धोरणात शिक्षक व शिक्षण घेऊन आम्हाला फक्त शिकवू द्यावे. शिक्षणाचे खाजगीकरण बंद करावे, कत्रांटी शिक्षक भरतीस विरोध, शाळा दत्तक योजनेस सामुहिक विरोध करून शाळा वाचविणे, कमी पटाच्या शाळा बंद करण्यास विरोध या प्रमुख मागणीसाठी तामिळनाडू येथून निघालेली भारत पेन्शन संघर्ष यात्रा 8000 किलोमिटर प्रवास करून अमरावती येथे पोहचली असे बसवराज गुर्रीकर यांनी आपल्या मनोगत मधे सांगितले. 

           राष्ट्रीय पातळीवरून शिक्षणावर 6 टक्के खर्च होता नसल्याबद्दल ची खंत आपल्या इंगर्जीतील भाषणातून रमा देवी यांनी व्यक्त केली. सरकारी शाळा बंद पाडून संस्थानिकांचे ताब्यात देण्याचा शासनाचा डाव असल्याचे कल्याणजी लवांडे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. महिलांनी संघर्षात मागे राहू नये आपल्या न्याय मागण्यासाठी अखिल चे आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन सीमा माथूर सरचिटणीस वूमन नेटवर्क यांनी केले.

          या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वृषाली देशमुख आणि सुभाष सहारे यांनी सयुक्तपणे केले तर आभार प्रदर्शन मदन उमक यांनी पार पाडले.

भारत यात्रा मधील मान्यवर यांनी सांगितले

            कार्यक्रमाकरिता किरण पाटील, सुभाष सहारे, गजानन चौधरी, नीलकंठ यावले, राजेंद्र होले, विजय उभाड, प्रमोद घाटोल, मनोज चोरपगार, संजय नागे, संजय वाटाणे, सूरज मंडे, प्रमोद दखणे, प्रवीण खरबडे, संतोष कोठाडे, गजानन निर्मळ, प्रफुल्ल ढोरे, अरुण देशमुख, प्रशांत भगेवार, प्रफुल्ल भोरे, जितेंद्र गहेलवार, उज्वल पंचवटे, भूषण ठाकूर, सुनील बागडे, जितेंद्र यावले, गजानन खोपे, प्रवीण सेंदरे, दिगंबर जामनिक, निखिल सवाई, उमेश शिंदे, दिनेश धुर्वे, प्रशांत निनावे, गजानन इंगळे, लखन जाधव, सुनीता पाटील, संगीता देव, वृषाली देशमुख, संगीता कडू, पुष्पा यावले, सुनीता राऊत, संगीता मंडे, ऋतुजा नीचळ, स्वाती दुधे, अरुणा गभने, इंदिरा पोटेकर, सुनीता जुंबळे, सविता दारोकर, माधुरी देशपांडे, अंजली नागपुरे, अल्का वर्धे, भारती कारंजकर, वर्षाली दातीर, कविता बडगुजर, प्रणिता बोडखे, कृष्णकला चूनडे, प्रतिभा कडू, रेखा राठोड, नलू ससाणे, छाया पोटेकर, गजेंद्र खोलापुरे, सुभाष विघ्ने, दयानंद भोंग, हरिदास पाडर, विठ्ठल तलांडे, गजानन सोळंके, गजेन्द्र खोलापूरे, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ पदाधिकारी, महिला आघाडी आणि संपूर्ण जिल्हा कार्यकारणी तसेच सर्व तालुका शाखा पदाधिकारी व महिला आघाडी व तालुका कार्यकारणी व सामान्य सभासद, अमरावती जिल्ह्यातील आंदोलनास पाठिंबा दिलेल्या सर्व संघटनेचे पदाधिकारी व सामान्य सभासद, सर्व dcps/nps धारकांना व जेष्ठ व सेवानिवृत्त शिक्षक व कर्मचारी आणि महिला शिक्षिका भगिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.