कन्या विद्यालयात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी.

चेतक हत्तीमारे 

जिल्हा प्रतिनिधी 

साकोली:- येथील स्थानिक कन्या विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.

           या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक श्री चोले तर प्रमुख पाहुणे मुख्याध्यापक श्री राऊत आनंदाबाई कन्या प्राथमिक शाळा , कापगते सर, भुरे शिक्षिका, नगरकर शिक्षिका उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरूवात द्वीप प्रज्वलन करून करण्यात आले. या वेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी व मा. पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.सदर कार्यक्रमाप्रसंगी शालेय विद्यार्थिनीनी गीत ,भाषण सादर केले. माटूरकर, नगरकर शिक्षिका यांनी महात्म्याच्या जीवनावर प्रकाश घालीत विद्यार्थीनींना जीवन परिचय करून दिला .अध्यक्षीय भाषणात महात्मा गांधी यांच्या मुळे आपल्याला स्वतंत्र मिळाले.आणि त्यांच्या अमूल्य कार्यामुळे त्यांना महात्मा पदवी देण्यात आली. 2ऑक्टोबर हा जागतिक अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो.तसेच लाल बहादूर शास्त्री यांनी जनतेला एक नारा दिला “जय जवान जय किसान ” असे सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

         सदर कार्यक्रमाचे संचालन झिंगरे शिक्षिका, प्रस्ताविक श्री कापगते सर तर आभार हत्तिमारे सर यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी भुरे यांनी प्रयत्न केले.