स्व.निर्धन पाटील वाघाये कला व विज्ञान महाविद्यालय मुरमाडी/तुपकर येथे लक्ष्मीनारायण दिन साजरा.

चेतक हत्तीमारे 

जिल्हा प्रतिनिधी 

 लाखनी:- लक्ष्मी शिक्षण संस्था व क्रीडा मंडळ केसलवाडा/वाघ द्वारा संचालित स्व.निर्धन पाटील वाघाये कला व विज्ञान महाविद्यालय मुरमाडी तुपकर येथे लक्ष्मीनारायण दिवस साजरा करण्यात आला.

      महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डाॅ. विश्वास खोब्रागडे यांनी रावबहादूर लक्ष्मीनारायण यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला आर्थिक दान तसेच जमीन दिली. नागपूर विद्यापीठाने रावबहादूर लक्ष्मीनारायण यांच्या कार्याचा गुणगौरव म्हणून तंत्रज्ञान संस्थेला लक्ष्मीनारायण माहिती तंत्रज्ञान संस्था असे नाव दिल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रा. विशाल गजभिये यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.डाॅ. अर्चना निखाडे, लिपीक खेमराज वाघाये,श्रीकांत धुर्वे,अजय मेश्राम,ग्रंथालय परिचर गितेश्वरी तरोणे, शिपाई किशोरी ननोरे,अमर जांभुळकर,तेजेंद्र सदावर्ती,शोएब शेख तसेच विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.