ब्रेकिंग न्यूज… 22 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या…  — गौरखेडा येथील घटना…

 

युवराज डोंगरे/खल्लार

      उपसंपादक

          खल्लार नजिकच्या गौरखेडा येथील 22 वर्षीय युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज 2 ऑक्टोबर रोजी घडली.

      अनुप रामचरन खंडारे वय 22 वर्ष असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असून त्याने रात्रीच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

      घटनेची माहिती पोलिस पाटील गजानन धुमाळे यांनी खल्लार पोलिसांना दिली खल्लार पोलिस स्टेशनचे पो हे कॉ ज्ञानेश्वर सिडाम, परेश श्रीराव, वेंकेश नाकील, शेख मुजफ्फर यांनी घटनास्थळ गाठून मृतकाचा व घटनेचा पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हारुग्णालय,दर्यापूर येथे पाठविला दुपारी दिड वाजताच्या सुमारास मृतकावर गौरखेडा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले मृतक युवकाच्या मागे तिन विवाहित बहिणी, एक अविवाहित बहीण व आजी असा आप्त परिवार आहे.