आळंदीत ग्रंथराज श्री.ज्ञानेश्वरी जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना ज्ञानेश्वरीचे वाटप..

 

दिनेश कुऱ्हाडे                                 उपसंपादक 

       आळंदी : येथील श्री.ज्ञानेश्वर शिक्षण संस्था,श्री.ज्ञानेश्वर महाराज संस्थान,श्री.ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती व आळंदी शहर पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने असलेला ओळख ज्ञानेश्वरी एक परिवार व परिवाराच्या माध्यमातून सुरू असलेला ओळख ज्ञानेश्वरीची उपक्रम,त्यामध्ये ग्रंथराज श्री. ज्ञानेश्वरीच्या जयंतीनिमित्त श्री. ज्ञानेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांना ज्ञानेश्वरीचे वाटप करण्यात आले.

          यावेळी सुरेश वडगावकर,डॉ.अभय टिळक,डॉ.पंकज महाराज गावडे, माऊली वीर,ॲड.राजेंद्र मुथा,अजित वडगावकर, एल.जी.घुंडरे,प्रकाश काळे,उमेश महाराज बागडे,सुभाष महाराज गेठे,भागवत महाराज साळुंखे,राहुल चव्हान,तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी,पालक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

        यावेळी मार्गदर्शन करताना पंकज महाराज गावडे म्हणाले की ज्ञानाच्या मार्गावर येणारे अडथळे ज्ञानेश्वरीच्या पारायणातून,ज्ञानेश्वरीच्या अभ्यासातून दूर होतात.

            अज्ञानाचे ढग दुर होऊन ज्ञानाचा प्रकाश निश्चितच पडतो. मनाच्या पडलावर यासाठी अवधान ठेऊन ज्ञानेश्वरीतील ओव्यांचे चिंतन मात्र करायला हवे.सद्गुरुंच्या कृपेसाठी ज्ञानेश्वरी पारायण आहे.

           उपस्थितांचे आभार अर्जुन मेदनकर यांनी मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीधर घुंडरे यांनी केले.पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.