नवजीवन सीबीएसई मध्ये रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न…

 

नागपूर विभागीय प्रतिनिधी: ऋग्वेद येवले

साकोली:नवजीवन कॉन्व्हेंट एंड इंग्लिश प्राय. स्कुल (सीबीएसई) साकोली येथे प्राचार्य मा. मुज्जमिल सय्यद सर, पर्यवेक्षिका वंदना घोडीचोर, वरिष्ठ शिक्षिका भारती व्यास, प्रशासकीय अधिकारी विनोद किरपान व सतीश गोटेफोडे यांच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून राष्ट्रप्रेम व सामाजिक ऐक्याची भावना जागृत ठेवण्यासाठी, व रक्ताच्या नात्याव्यतिरिक्त आपल्या मनाप्रमाणे नाती जोडल्या जावे व श्रावण पौर्णिमेचे औचित्य साधून सामूहिक रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

             या रक्षाबंधन कार्यक्रमासाठी वर्ग १ ते १० च्या विद्यार्थीनी उत्स्फूर्त सहभाग घेतला, रक्षाबंधन कार्यक्रमाच्या माध्यमातून वर्ग बांधवांना राखी बांधण्याचा संधी मिळाल्यामुळे वर्गबांधवांच्या मनगटावर राखी बांधून दिर्घ आयुष्य व सुख लाभो म्हणून प्रार्थना केली गेली. ताईने तयार केलेली राखी, वर्गबांधवांवर असेलेले परस्परावरील प्रेम व इतर सर्व संकटापासून रक्षण व्हावे म्हणून सुरक्षाकवच मनगटावर बांधून दिले असे या माध्यमातून दिसून आले. सर्व विद्यार्थ्यांना गोड़ चारून त्यांच तोडगोड व कौतूक करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता नवजीवन सीबीएसईचे सर्व शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी बहुमोलाचे सहकार्य केले.