डॉ.सतिश वारजुकर यांनी घेतली चिमूर तालुक्यातील सरपंच व उपसरपंच यांची बैठक…

 

अरमान बारसागडे 

तालुका प्रतिनिधी 

         चिमूर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतचे सरपंच,उपसरपंच यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ७४ चिमूर विधानसभा क्षेत्राचे समन्व्यक तथा उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश डॉ. सतिशभाऊ वारजुकर यांनी आज चिमूर येथे बैठक घेतली.

         या बैठकीला चिमूर तालुक्यातील सरपंच,उपसरपंच उपस्थित होते.त्यात गावातील मुख्य असलेली अडचण,शासकीय कार्यलयातंर्गत ग्रामपंचायतला येणाऱ्या अडचणी,गाव विकासासाठी असलेल्या योजना,ग्रामपंचायत मार्फत जनतेसाठी चालविण्यात येणाऱ्या योजना व त्यावर येणाऱ्या अडचणी आणि समस्या दूर कसा कराव्यात या विषयावर डॉ.सतीशभाऊ वारजुकर यांनी मार्गदर्शन केले.

           सोबतच सरपंच,उपसरपंच यांनी सांगितलेल्या समस्यावर शासन दरबारी सतत पाठपुरावा करण्याचे आश्वासन या बैठकीत देण्यात आले.

        या वेळी सरपंच कोलारा शोभाताई कोयचाडे,सरपंच बोरगांव बुट्टी रामदास चौधरी,सरपंच महादवाडी भोजराज कामडी, सरपंच कोलारी राजू अलोणे,सरपंच वाढोणा रवींद्र ढोणे, सरपंच विहीरगांव तू प्ररमानंद गुरनुले, सरपंच कान्हाळगांव विजेंद्र घरत, सरपंच हरणी चरणदास दडमल, सरपंच नेरी रेखाताई पिसे, सरपंच बोडधा रोशनीताई बारसागडे, सरपंच गडपिपरी जयमाला बोरकर, सरपंच अडेगाव देश कु. करिष्मा गजभे,सरपंच वाकर्ला लक्ष्मी तुमराम, सरपंच चिंचोली, वदंना ढोणे,सरपंच वडशी अन्नपूर्णा मांदाडे,सरपंच केवाडा,दिपीका गुरनुले, उपसरपंच शंकरपूर अशोक चौधरी,उपसरपंच साठगाव प्रितीताई दिडमुठे,उपसरपंच कल्पनाताई हरडे,बैठकीला उपस्थित या दरम्यान उपस्थित सरपंच व उपसरपंच महिलांनी डॉ.सतिशभाऊ वारजुकर यांना रक्षाबंधना निमित्त राखी बांधली…