जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्दशाने कन्हानच्या १४५ रमाई घरकुल योजनाधारक लाभार्थ्यांचा मार्ग मोकळा.. — कन्हान भाजपा पदाधिका-यांच्या निवेदनाची उपमुख्यमंत्रीच्या मानद सचिवानी घेतली दखल. 

 

     कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

कन्हान : – रमाई घरकुल योजनातंर्गत मागील साड़े तीन वर्षात अनुसूचित जातीच्या १४५ लाभार्थ्याच्या अर्जावर नगरपरिषद कन्हानच्या उदासीनतेमुळे कुठलीही कार्यवाही न झाल्याने लाभार्थ्यांंना न्याय मिळण्यास उशीर झाला.

          भाजपा कन्हान शहर अध्यक्ष डॉ मनोहर पाठक यांच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणविस यांना कन्हानच्या रमाई आवास योजनेंतर्गत लाभार्थ्यांच्या समस्यांबाबत निवेदन दिल्याने त्यांचे मानद सचिव श्री संदीप जोशींनी त्वरित दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयात १ जुलैला बैठक घेऊन जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांनी मुख्याधिकारी यांना ७ दिवसात सर्व पात्र लाभार्थ्यांना घरकुल देण्याकरिता कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याने रमाई घरकुल योजना लाभार्थ्यांचा मार्ग मोकळा झाला. 

           कन्हान नगरपरिषदेला रमाई घरकुल योजने अंतर्गत मागिल साड़ेतीन वर्षात अनुसूचित जातीच्या शेकडो लाभार्थ्यांनी अर्ज सादर केले होते.

       परंतु नगर परिषद कन्हानच्या उदासीनतेमुळे १४५ लाभार्थ्यांच्या अर्ज़ावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही केली नव्हती. त्यामुळे सदर लाभार्थ्यांना न्याय मिळावा या करिता कन्हान भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष डॉ मनोहर पाठक यांच्या शिष्ठमंडळाने (दि.१९) जून २०२३ ला उपमुख्यमंत्री ना. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणविस यांच्याकड़े निवेदन सादर केले होते.

        त्या अनुषंगाने उपमुख्य मंत्री यांचे मानद सचिव श्री संदीप जोशी यांनी त्वरित दखल घेऊन जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात १ जुलै २०२३ ला बैठक आयोजित केली. 

        या बैठकिला स्वत: संदीपजी जोशी,जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर,उपविभागीय अधिकारी सौ वंदना सौरंगपते,नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री बोरकर,भाजपा कन्हान शहर अध्यक्ष डॉ मनोहर पाठक,भाजपा ओबीसी आघाडी महामंत्री रामभाऊ दिवटे,भाजपा कन्हान शहर महामंत्री सुनिल लाडेकर,भाजपा तालुका उपाध्यक्ष कामेश्वर शर्मा,भाजपा अनुसूचित जाती मोर्चा नागपूर ग्रा.जिल्हा उपाध्यक्ष रिंकेश चवरे, न.प.कन्हान गट नेते राजेन्द्र शेंदरे,मनोज कुरडकर,नगरसेविका संगिता खोब्रागडे,नगरसेविका वंदना कुरडकर,अजय लोंढे,शैलेश शेळके,संजय रंगारी,विक्की सोलंकी,मयूर माटे,महेंद्र चव्हाण,सुरेश कळम्बे,अमोल साकोरे बैठकीला उपस्थित होते.

          या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी नगरपरिषद मुख्याधिकारी यांना ७ दिवसाच्या आत सर्व पात्र लाभार्थ्यांना रमाई आवास योजने अंतर्गत घरकुल देण्याकरिता कार्यवाही करावी अशे निर्देश दिले. 

           त्यामुळे यादीतील अनुसूचित जातीच्या १४५ लाभार्थ्यांना घरकुल मिळन्याचा मार्ग मोकळा झाला.