राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधी पक्षनेते पदी जितेंद्र आव्हाड,प्रतोत पदही त्यांच्याकडे… — शरदचंद्र पवार आत्मविश्वासी नेतृत्व..

 

दिक्षा कऱ्हाडे

वृत्त संपादिका

           राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तुकडे करीत अजितदादा पवारांनी महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात धक्कादायक प्रकार आज घडवून आणल्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष  जयंत पाटील यांनी आमदार व माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांची पक्ष प्रतोत म्हणून तात्काळ निवड केली.याच बरोबर विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदी सुध्दा त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

             पक्षप्रमुख शरदचंद्र पवार हे राजकीय क्षेत्रातील चाणक्य असून ते केव्हा काय भूमिका घेतील हे पुढे चालून जनतेच्या लक्षात येणार आहे.तद्वतच त्यांच्या पत्रकार परिषदेनंतर ते हतबल असल्याचे दिसून येत नव्हते तर ते जनतेच्या न्यायालयात वाद मिटवू असे आत्मविश्वासाने बोलत होते.

           यावरून असे लक्षात येते की,माजी केंद्रीय मंत्री व माजी मुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरदचंद्र पवार हे येणाऱ्या विधानसभा व लोकसभा निवडणूकीला गंभीरपणे सामोरे जातील.

            मात्र,पक्ष नेतृत्वासोबत गद्दारी करणारे नेते आता जनतेच्या निशाण्यावर असणार आहेत असे राजकीय चित्र दिसते आहे.