वन कर्मचाऱ्यांच्या मारहाणीत एकाचा मृत्यू इतर सहकारी फरार… — सामाजिक कार्यकर्ते श्री. संतोष रामचंद्र ताटीकोडावार, यांनी आरोप करत केली चौकशीची मागणी…

डॉ.जगदीश वेन्नम

  संपादक

30 जून 2023 रोजी श्री.लचन्ना बुचय्या जाडी यांनी मला प्रत्यक्षात भेटून निवेदन वजा पत्र दिले की, लचन्ना बुचय्या जाडी यांचे भाऊ रेड्डी बुच्चम जाडी,श्री. कुंमरी सडवली, श्री.देवेंद्र जंगम, श्री.कोमल्ली सुनतकर व दुडम सिनु हे दि. 24 जून 2023 रोजी रात्री मौजा आदीमुत्तापूर तालुका सिरोंचा येथील जंगलालगत कामानिमित्य गेले होते. तिथे वनकर्मचाऱ्यांनी त्यांना पकडले व एका व्यक्तिने रात्रभर मयत रेड्डी बुच्चम जाडी याला अमानुष मारहाण केले.त्यानंतर सकाळी 4 वाजता च्या सुमारास मयत रेड्डी बुच्चम जाडी व इतर यांना घरी जाण्यास सोडले होते.दि. 25/06/2023 रोजी मयत रेड्डी बुच्चम जाडी हे सकाही 4-5 च्या सुमारास येवून घरी झोपले त्यावेळी मयत रेड्डी बुच्चम जाडी चे भाउ श्री. लचन्ना जाडी हे सकाळी झोपेतून उटले आणि भावाला कामाला जावू म्हणून उठवू लागले.

       

       परंतु तो न उठल्याने तो पांघरूण झोपून असल्याने त्याच्या वरची चादर त्यांनी काढले. तेव्हा त्याला मयत रेड्डी बुच्चम जाडी याच्या मानेवर व शरिरावर मारल्याचे घाव होते. त्याला उठवून शरिरावर कशाचे घाव असल्याचे विचारणा केल्यावर मयत रेड्डी बुच्चम जाडी यांनी आपल्या भावाला श्री लचन्ना याला सांगीतले मला वनकर्मचाऱ्यांनी मारहाण केली आहे.आणि त्याला सिरोंचा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, गुप्त मार जास्त असल्याने इथे त्याचा उपचार होणार नाही त्याला मोठ्या हॉस्पिटलला घेऊन जाण्यास सांगितले.मग त्याला तेलंगणा मनचीरियाल एम जी एम.रुग्णालयात त्याला हलविण्यात आले आणि उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. 

         पोलिस अधिकाऱ्यां कडून मयत रेड्डी बुच्चम जाडी हे कसा मरण पावला म्हणून श्री. लचन्ना याला विचारपूस केली. मयत रेड्डी बुच्चम जाडी याला दफन केलेल्या जागेवर घेवून गेले. त्यानंतर पोलिसांनी पोलिस स्टेशन येथे बोलावले आणि बयाण घेतले त्यावेळी आम्ही काय बयाण दिले आम्हाला समजले नाही. श्री.लचन्ना व त्याचे कुंटूंबिय हे दुःखात असल्याने पोलिसांना घटणेची वास्तविक माहिती देवू शकले नाही.असे सामाजिक कार्यकर्ते संतोष रामचंद्र ताटीकोडावार यांना सदर संपुर्ण घटणेची माहिती देत श्री. लचन्ना जाडी यांनी लेखी पत्र देवून कळविले.मयत रेड्डी बुच्चम जाडी यांचे मृत्यू झाल्यावर अमाणूष मारहाण प्रकरणी तिथे उपस्थित असलेले त्यांचे सहकारी सद्या गाव सोडून बाहेर गेलेले आहे.मयत रेड्डी बुच्चम जाडी याला वनकर्मचा-यांद्वारे अमानूश मारहाण केल्याचे त्यांच्या परिवाराचे म्हणणे आहे. मरते वेळी त्यांनी मयत रेड्डी बुच्चम जाडी यांनी त्यांचे भावाला ही माहिती दिली. मयत रेड्डी बुच्चम जाडी यांची कुटूंबिय हे अशिक्षीत असल्याने त्यांना काय करावे असा प्रश्न पडलेला आहे.

       करीता सदर घटनेची अतिशिघ्र गतिने चौकशी करण्यात यावी.आणि वनकर्मचा-यांकडून मयत रेड्डी बुच्चम जाडी यांचे सोबत असलेले इतर सहकारी यांना धमकावून गाव सोडण्याचे सांगण्याची दाट शक्यता आहे. तसेच प्रशासन सदर दोषी गुन्हेगारांना पाठीशी घालण्याची. दाट शक्यता असल्याने तसेच पुरावे नष्ट करण्याचे षडयंत्र सुरू होण्याअगोदर तात्काळ कार्यवाही करून दोषींवर कलम 34, 302 भा.द.वी. अन्वयें नोंद करून पिडीत कुटूंबियांना न्याय देण्यात यावे.अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्री. संतोष रामचंद्र ताटीकोडावार यांनी केली आहे.