“राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत,… — अजितदादा पवारांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ,सहकारी आमदार सुध्दा झाले मंत्री… — म्हणूनच मंत्रीमंडळाचा विस्तार थांबवलेला होता काय?”की,सत्तेत परत येणार नाही याची गोपनीय चाहूल लागली होती.. — अॅड.प्रकाश आंबेडकरांचे ईडी संदर्भातील भाकीत ठरले खरे…

 

प्रदीप रामटेके

मुख्य संपादक

          राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा पवार यांनी आज दुपारी उपमुख्यमंत्री पदाची शपथ राजभवन येथे घेतली.त्यांच्या सोबत अन्य ८ सहकारी आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेतली.

              महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल रमेश बैस यांनी अजितदादा पवार व त्यांच्या सहकारी आमदारांना कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ दिली. 

          कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेणाऱ्यात छगन भुजबळ,दिलीप वळसे पाटील,धनंजय मुंडे,आदिती तटकरे,धर्मरावबाबा आत्राम,हसन मुश्रीफ,संजय बनसोडे,संजय पाटील यांचा समावेश आहे. 

               महाराष्ट्र राज्यातील जनतेला हवा लागू न देता अजितदादा पवार व त्यांचे सहकारी आमदार मंत्री झाले याचे आश्चर्य वाटते.

               वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड.प्रकाश आंबेडकरांनी दोन महिन्यांपूर्वी भाकीत केले होते की ईडीच्या धाकाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार भाजपाच्या गळाला लागतील व सत्ताधारी बनतील,अशा पध्दतीचे त्यांचे भाकीत आज खरे ठरले.

             कदाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चाहूल लागली होती की,”आमच्या बलावर महाराष्ट्र राज्यात आम्ही परत सत्तेवर येऊ शकत नाही,याचे वास्तव त्यांनी अजितदादा पवार व त्यांच्या सहकारी आमदारांना कॅबिनेट मंत्री पदाची शपथ देऊन पुढे आणले आहे.

           राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत सहभागी होणार असल्याची जाणीव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना असल्यामुळे त्यांनी आजपर्यंत जाणिवपूर्वक मंत्रीमंडळाचा विस्तार केला नव्हता असे आता आजच्या शपथविधी सोहळ्यावरुन दिसून येते आहे.

             मात्र,माजी मुख्यमंत्री उद्धवराव ठाकरे यांच्याच शिवसेनेला महाराष्ट्र राज्यातील शिवसैनिक मानत असल्याने,काॅंग्रेस,वंचित,व शिवसेना उद्धवराव ठाकरे यांच्याच पक्षाची सत्ता पुढे चालून महाराष्ट्र राज्यात येण्यासाठी जनता आतापासूनच एकवटली आहे.

     राष्ट्रवादी काँग्रेस खरोखरच फुटली काय?याचे चित्र अजूनतरी पुढे आले नाही..