राष्ट्रीय सिकलसेल निर्मुलन अभियानाचा शुभारंभ व सिकलसेल रुग्णांना उपचार करण्याकरीता कार्ड वाटप…

डॉ.जगदीश वेन्नम

  संपादक

गडचिरोली, दि. 02 : जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे राष्ट्रीय सिकलसेल निर्मुलन अभियानाचा शुभारंभ व सिकलसेल रुग्णांना उपचार करण्याकरीता कार्ड वाटप डॉ. सतीश सोळंखी जिल्हा शल्य चिकित्स्क सामान्य रुग्णालय गडचिरोली, डॉ. दावल साळवे, जिल्हा आरोग्य अधिकारी, प्रमोदजी पिपरे, योगिता पिपरे माजी नागराध्यक्ष, कविता उरकुडे, ज्योती बागडे, तसेच हेमंत जमबेवार, अनिता मडावी, जिल्हा परिषद गडचिरोली यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी रुग्णालयातील सर्व आरोग्य कर्मचाऱी, नागरिक व सिकलसेल रुग्ण उपस्थित होते, यावेळी कार्यक्रम चे प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावलं साळवे बोलताना सर्व सिकलसेल रुग्णांनी न घाबरता योग्य वेळी तपासणी करुन औषधी नियमीत घ्यावी ,तसेच अशक्तपणा , सांधेदुखी अशाप्रकारची लक्षणे दिसल्यास सिकलसेल रक्ततपासणी करुन घ्यावी, ज्या सिकलसेल रुगणांना कार्ड मिळाले असतील त्यांनी औषधोपचार करीता उपयोग करावा, तसेच सर्व जनतेनी सिकलसेल तपासणी करून घ्यावी असे आवाहन केले आहे. 

       डॉ. सतीश सोळंखी जिल्हा शल्य चिकित्सक यांनी सिकलसेल रुग्णांना रुग्णालय मधील सर्व सेवा मोफत देण्यात येत आहे, तसेच ज्या रुग्णांना शस्त्रक्रिय करण्याची आवश्यकता आहे अश्या सर्व रुग्णांनाची नोंद प्रधानमंत्री आयुष्यमान जन आरोग्य योजना गोल्डन कार्ड मध्ये करण्यात येणार आहे तसेच आभा कार्ड काढून त्यांना योजनेचा लाभ देण्यात येणार असे आवाहन केले आहे. प्रमोदजी पिपरे यांनी जिल्यातील सर्व सिकलसेल रुग्णांना शासनाच्या सर्व योजनाचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करणार व शासनाकडे त्याकरीता पाठपुरावा करण्याचे आश्वासन उपस्थिती नागरिक व सिकलसेल रुग्णांना दिले. हेमंत जांबेवार यांनी सिकलसेल रुग्णांनी योजनेचे लाभ घेऊन योग्य नियमित औषधं उपचार करण्यासाठी सांगितले आहे.. तसेच गडचिरोली जिल्यातील सर्व जनतेनी सिकलसेल तपासणी करून घ्यावी असे आवाहन केले आहे. या कार्यक्रम करिता डॉ. बागराज धुर्वे बाहय संपर्क वैद्यकीय अधिकारी सामान्य रुग्णालय गडचिरोली, डॉ. सुनील मडावी तालुका आरोग्य अधिकारी गडचिरोली, डॉ. माधुरी किलन्नाके मॅडम, डॉ. विनोद म्हशाखेत्री, डॉ. पंकज हेमके, डॉ. दीक्षांत मेश्राम, HWC कॉन्सलतंट, डॉ. चकोर रोकडे, डॉ. मुकुंद डबाले उपस्थिती होते. मा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते मध्ये प्रदेश मधील शहाडोल जिल्ह्यात सिकलसेल निर्मूलन अभियान चा शुभारंभ करण्यात आला. त्या नंतर संपूर्ण जिल्ह्यातील आरोग्य संस्था मध्ये सिकलसेल रुग्णांची तपासणी करून कार्ड वाटत करण्यात आले आहे.. जिल्हा सामान्य रुग्णालय मध्ये एकूण 232 रुग्णांची तपासणी करून 65 सिकलसेल रुग्णांना कार्ड वाटप करण्यात आले आहे.. सदर कार्यक्रम चे संचालन अजय ठाकरे प्रयोगशाळा तंत्रज्ञ् यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ.बागराज धुर्वे यांनी केले. सिकलसेल तपासणी डॉ. चकोर रोकडे व स्वप्नील चापले यांनी केले. रुग्णांची नोंद नीता बालपांडे सिकलसेल समुपदेशक यांनी केले. कार्यक्रम चे व्यवस्थापन जिल्हा सिकलसेल समन्वयक रचना फुलझेले यांनी केले. तसेच विशेष सहकार्य मंजू सिस्टर ओपिडी इन्चार्ज, जयश देशमुख, तुराब शेख, मनोज गेडाम, डॉ. मृणाली रामटेके यांनी केले.