माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती,”कृषीदिन,म्हणून साजरी.. — पंचायत समितीच्या कृषी विभागा तर्फे साजरी करण्यात आली जयंती.  — या निमित्ताने वृक्षारोपण व शेतकऱ्यांना ज्वारी वाटप.. 

 

     कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

पारशिवनी:-पंचायत समिती पारशिवनी येथे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती कृषीदिन म्हणून कृषी विभाग पारशिवनी व पारशिवनी पंचायत समिती वतीने साजरी करण्यात आली.

         यानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले व शेतकऱ्यांना ज्वारी वाटप करण्यात आली.

          आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती मगलाताई उमराव निंबोने या होत्या तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून गट विकास अधिकारी पारशिवनी सुभाष जाधव होते. त्यानी शेती व तिचे महत्व याविषयी मार्गदर्शन केले.

               तालुका कृषी अधिकारी पारशिवनी सूरज शेंडे यांनी कृषी संजिवनी सप्ताह समापन व प्रधानमंत्री पिक विमा योजने विषयी माहिती दिली.

           पंचायत समिती कृषी अधिकारी ए.पी. देशमुख यानी प्रास्ताविक केले.कार्यक्रमाला प्रगतिशिल शेतकरी,कृषीसहाय्यक,ग्रामसेवक उपस्थित होते. 

          विषेश अतिथी म्हणून माजी तालुका कृषी अधिकारी डॉ.ए.टी.गच्चे मॅडम प्रामुख्याने उपस्थित होत्या.