हिंगणघाट पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रगटीकरण पथकाची तिव्र गति ची कार्यवाही… — 1,50,000/ रु चा मुद्देमाल जप्त…

  सैय्यद ज़ाकिर

जिल्हा प्रतिनिधि वर्धा

हिगणघाट :– सत्यता या प्रमाने आहे की आज दी. 1/04/2024/ रोजी गुप्त मुखबिर कडुन मिडालेल्या खात्रिशिर माहिती वरुण वृष्टि जैन भा,पो,से,प्रभारी ठाणेदार पोलीस स्टेशन हिगणघाट यांचे आदेशाने पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रगटीकरणचे पथकाने मुखबीरचे ख़बरेवरुन शास्त्री वार्ड हिगणघाट येथे नाकेबंदी करुन नमूद अरोपितांना पकडूंन त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारले. 

              (१)धीरज गजानन साड़वे वय 19 वर्ष ,(2)श्रीकांत बाबाराव डफ वय 24 वर्ष दोन्ही रा,शास्त्री वार्ड ,हिगणघाट ऐसे सांगितल्याने त्यांचे ताब्यातिल मोपेड गाड़ी ची पाहणी केली असता अरोपितांचे मोपेड गाडिवर 04 खर्ड्याच्या खोक्या मध्ये प्रिमियम न.1कंपनीच्या देशी दारुने भरलेल्या 400 शिष्या मिळून आल्याने आरोपी क्र.2 याचे घराची घरझडती घेतली असता आरोपी क्र.2 याचे घरा मध्ये 04 खर्ड्याचे खोक्या मध्ये प्रीमियम न.1 कंपनीच्या देशी दारुने भरलेल्या 400 शिष्या असा एकूण 800 शिष्या प्रति शीशी 100/रू प्रमाणे 80,000/रु,व मोपेड गाड़ी क्र.एम एच 32 ए 0571 जूनि वापरती अंदाजे की.70,000/रु ऐसा एकूण की.1,50,000/-रु चा माल मिळून आल्याने सदरचा माल मौका जप्ती पंचनाम्या प्रमाणे जपत करुन अरोपि विरुद्ध गुन्हा नोंद करून तपासात घेतला.

              सदरची कारवाही नुरूल हसन अधीक्षक वर्धा ,डॉ. सागर कवडे अप्पर पोलीस अधीक्षक वर्धा, रोशन पंडित उपविभागीय पुलिस अधिकारी हिगणघाट यांचे मार्गदर्शनात वृष्टि जैन भा.पो.प्रभारी ठाणेदार पुलिस स्टेशन हिगणघाट यांचे निर्देशानुसार गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पो,हवा ,प्रवीण देशमुख ,सुनील मड्नकर, पो,ना नितिन ताराचंदी,नरेंद्र आऱेकर,पो,शि,विजय हारनूर यांनी केली आहे.