शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सिंदेवाही तर्फे आज बसस्थानक परीसरात स्वच्छता श्रमदान मोहिम…

 

अमान क़ुरैशी

जिल्हा प्रतिनिधि

दखल न्यूज़ भारत

        सिंदेवाही – आज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सिंदेवाही जि. चंद्रपूर तर्फे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत महात्मा गांधी जयंती च्या निमीत्त दिनांक १/१०/२०२३ रोजी सकाळी १० वाजता बस स्थानक सिंदेवाही येथे स्वच्छता पधरवाडा आयोजित स्वच्छता श्रमदान  करण्यात आले होते.

         सदर कार्यक्रमाला सिंदेवाही नगर पंचायत चे नगराध्यक्ष स्वप्नील कावळे व बस स्थानक आगार प्रमुख शंभरकर यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सिंदेवाही चे गटनिदेशक लक्कावार सर, ज्येष्ठ निदेशक तिघरे सर, कर्मचारी वृंद आणि मोठ्या संख्येने संस्थेमधिल प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत महात्मा गांधी जयंती च्या निमीत्त स्वच्छता मोहीम श्रमदान करून यशस्वी करण्यात आली.