सामाजिक न्याय भवन येथे ‘एक तारीख एक तास’ उपक्रम संपन्न…

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक

पुणे : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण पुणे विभाग व सहायक आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एक तारीख एक तास’ हा स्वच्छता उपक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येरवडा येथे राबविण्यात आला.

         या उपक्रमास प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण बाळासाहेब सोळंकी, सहायक आयुक्त समाज कल्याण विशाल लोंढे, विशेष अधिकारी श्री. मल्लिनाथ हरसुरे तसेच दोन्ही कार्यालयांचे कर्मचारी, सामाजिक न्याय विभागाअंतर्गत कार्यरत महामंडळातील अधिकारी, कर्मचारी तसेच समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

           यावेळी सर्व अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सामाजिक न्याय भवन परिसराची स्वच्छता केली. तसेच प्रादेशिक उपायुक्त श्री. सोळंकी आणि सहायक आयुक्त लोंढे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधून मार्गदर्शन केले.

        यावेळी गृहप्रमुख श्रीमती पद्मा सुतार, गृहपाल जी.एम. कळसकर, कार्यालय अधीक्षक संतोष होगाडे, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक श्रीमती माधुरी कांबळे आदी उपस्थित होते.