Home Social मानवतेचा संदेश देत,नागपुर येथे बर्थडे पार्टी मध्ये सापडलेला मोबाईल जितेंद्र गाडगे यांनी...

मानवतेचा संदेश देत,नागपुर येथे बर्थडे पार्टी मध्ये सापडलेला मोबाईल जितेंद्र गाडगे यांनी दीला परत…

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी 

     चिमूर तालुक्यातील नेरी जवळील मौजा उसेगांव येथील जीतेंद्र गाडगे यांना २४ में ला नागपुर येथील अर्जुना सेलेब्रेशन खामला येथील,”बर्थ डे पार्टी मध्ये,सापडलेला मोबाईल ३० में ला परत दीलाय.

       नागपुर येथे २४ में ला आशीष नगरकर यांच्या मुलांचा वाढदीवसाचा कार्यक्रम सांयकाळी अर्जुना सेलेब्रेशन हॉल,खामला येथे होता.त्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला जीतेंद्र गाडगे हे कुटुबांसहीत उपस्थीत होते. 

         कार्यक्रम सुरु असतांना जीतेंद्र गाडगे यांचा मुलगा हींमाशु गाडगे याला खेळत असतांना,एका चेअर वर मोबाईल मीळाला.

       पण हा मोबाईल बंद होता.हा कुणाचा मोबाईल आहे याची शोधाशोध केली असता मोबाईल मालक मीळाला नाही.२५ में ला,”रीयल मी,या कंपनीचा महागडा मोबाईल चार्जिंग केला असता व चालु केला,तेंव्हा ज्यांचा मोबाईल होता त्या अमोल बारसागडे नामक व्यक्तीचा फोन आला.

       तेव्हा मोबाईल ज्या व्यक्तीचा होता,त्या व्यक्तीचा पत्ता लागला.नागपुर येथील बारसागडे नामक हे सुध्दा वाढदिवसाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते.पण हा बंद असलेला मोबाईल या कार्यक्रमात पडला.त्यामुळे याचा शोध घेता आला नाही.

         अखेर ३१ में ला आशीष नगरकर हे चिमूर तालुक्यातील शिवरा येथे लग्न समारंभासाठी आले असता यांच्याकडे जीतेंद्र गाडगे यांनी मानवतेचा संदेश देत मोबाईल परत दीला.या कार्यामुळे अमोल बारसागडे कुटुबांनी गाडगे कुटुंबीयांचे धन्यवाद मानले….