Home Maharashtra अत्याधुनिक कबड्डी मैदानाच्या बांधकामाची खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह आयुक्तांनी केली पहाणी…

अत्याधुनिक कबड्डी मैदानाच्या बांधकामाची खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह आयुक्तांनी केली पहाणी…

उपक्षम रामटेके/शुभम गजभिये..

       खासदार प्रणिती शिंदे यांच्या तीन कोटी रुपये विशेष निधीतून होणाऱ्या अत्याधुनिक कबड्डी मैदानाच्या बांधकामाची सोमपा आयुक्तांकडून पाहणी करण्यात आली,काम दर्जेदार आणि लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले.यावेळी खासदार प्रणिती शिंदे उपस्थित होत्या.

             आपल्या महाराष्ट्राला मातीतील खेळाची उज्ज्वल परंपरा आहे.त्यामुळे आपल्या मातीतील कबड्डी खेळाला वैभव मिळवून देण्यासाठी आणि सोलापूर जिल्ह्यातील खेळाडूंना उत्तम संधी देवून भविष्यासाठी तयार करण्यासाठी,कब्बडीचे माहेरघर असलेल्या “सेटलमेंट मैदान”येथे खासदार प्रणिती शिंदे यांनी आपल्या विशेष निधीतून तीन कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला.

        त्या निधीतून अत्याधुनिक कब्बडी मैदानाचे बांधकाम सुरू झाले असून या कब्बडी मैदानाच्या बांधकामाची पाहणी खासदार प्रणिती शिंदे यांच्या सोबत सोलापूर महानगरपालीकेचे आयुक्त डॉ.सचिन ओंबासे यांनी केली.

         यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना मैदानाचे काम दर्जेदार आणि उत्तम करण्यात यावे अशी सूचना करून मैदानाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले.