प्रस्थापित व्यवस्थेत देव धर्म संस्कृती विज्ञान तंत्रज्ञान या पाच गोष्टी आहेत,आणि या व्यवस्थेत या पाच गोष्टींचा विकास पण झाला आहे.परंतु या पाच गोष्टींचा संकल्पनांचा विकास झाला,परंतु त्यासोबतच या व्यवस्थेत वर्ग,वर्ण,जाती,वंश,निर्माण झाले,ते प्रस्थापित झाले.नुसते प्रस्थापित होऊनच थांबले नाहीत,तर आर्थिक सामाजिक विषमता यातून निर्माण झाली.कारण या वर्गात जातीत वंशात श्रेष्ठ कनिष्ठ, उच नीच,स्पृश्य अस्पृश्य,शुद्ध अशुद्ध,पवित्र अपवित्र असा भेदभाव करणारी संस्कृती निर्माण झाली.
भेदभावाची ही संस्कृती केवळ निर्माण होऊन थांबली नाही,तर या संस्कृतीने अन्याय अत्याचार भ्रष्टाचार,अनीती चे रूप धारण केले.नुसते रूपच घेतले नाही,तर अन्याय अत्याचार भ्रष्टाचार अनीती हा या व्यवस्थेचा हक्क आणि धर्म च होऊन बसला.वरच्या वंशाच्या जातीच्या माणसाला खालच्याचे आर्थिक सामाजिक शोषण करणे,त्याचे हक्क नाकारणे हा एक कायदाच होऊन बसला.ती एक धर्मसंस्कृतीच बनली.अन्याय अत्याचार,भ्रष्टाचार,काळाबाजार,शोषण,पिळवणूक , दादागिरी,हिंसा ,साठेबाजी या गोष्टींना जेंव्हा आम जनता संमती दर्शविते,योग्यच मानते तेंव्हा या वाईट गोष्टीना नैतिकता प्राप्त होते.यामुळेच विषमता पक्की मजबूत दृढ बनते.
अश्या या विषमतावादी प्रस्थापित व्यवस्थेत स्वातंत्र्य समता बंधुभाव स्त्रीपुरूष समता,धर्मनिरपेक्षता,समाजवाद ,मानवता,या माणसाला प्रगती पथावर नेणाऱ्या ,मानविमूल्यांचा ऱ्हास होतो,ही मूल्य अशा विषमतावादी प्रस्थापित व्यवस्थेत रुजने कठीण होते. तरी खडकावरही उगवणारे टिकणारे वाढणारे काही वृक्ष असतात,तशी काही महामानव या व्यवस्थेत जन्मास येतात,मरेपर्यंत आपले कार्य करतात,वाळवंटातही हिरवळ निर्माण करतात,विस्थापिताना सुखद अनुभव देतात,त्यांचा आत्मविश्वास जागृत करतात,हिंमत देतात.विचाराची ज्योत पेटवतात,ज्योतीच्या मशाली बनतात,आणि त्यातून विद्रोह जन्मास येतो.
प्रस्थापित व्यवस्थेतील वर्गीय जातीय धर्मांध,गोष्टींचा बळी ठरलेला बहुजन समाज त्याला जेव्हा या वर्गीय जातीय धर्माचे दुष्परिणाम दिसायला लागतात,या गोष्टीमुळेच आपले जीवन विस्थापित झाले आहे.यामुळेच आपल्या जीवनात दुःख दारिद्र्य अद्न्यान आहे,हे जेंव्हा महामानवांच्या विचार जागरणने सामान्य माणूस जागृत होईल,तेंव्हा त्यास आपल्या विस्थापित अवस्थेची जाणीव होईल,तेंव्हा आपल्या दैनंदिन जीवनातील अस्वस्थता ,बेचैनी,मानसिक अस्थिरता याची कारणे कळायला लागतील,तेंव्हा हा समाज विद्रोहाची मशाल हाती घेईल,शाहू फुले,आंबेडकर मार्क्स प्रमाणे.


