अंकिता पाटील ठाकरे यांनी दहावीच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांना दिल्या शुभेच्छा.

  बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी

     महाराष्ट्र राज्य माध्यमिक विभागाची इयत्ता 10वीची परीक्षा 1 मार्च रोजी सुरू होत असून परीक्षार्थी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी भाजप युवा मोर्चा पुणे जिल्हाध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांनी श्री. नारायणदास रामदास हायस्कूल इंदापूर या ठिकाणी येऊन विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन त्यांना परीक्षेत यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

    विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक करिअरमधील इयत्ता 10वी अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. विद्यार्थ्यांना या परीक्षेमध्ये यश मिळावे.विद्यार्थी कोणताही ताण-तणाव न घेता या परीक्षेला सामोरे जावे , त्यांना प्रेरणा देण्यासाठी अंकिता पाटील ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना संवाद साधत परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.