मौजा खेडी गावात बस फेरीसह पाणीपुरवठा बंद :- ठेकेदाराविरुद्ध पोलिसात तक्रार.. 

      सुधाकर दुधे

तालुका प्रतिनिधी सावली 

       “हर घर नल, हर घर जल” अंतर्गत पाणी पुरविण्याच्या मिशनमध्ये नवीन योजनेच्या कामात पूर्वी मिळत असले ले पाणी कंत्राटदाराच्या नियोजना अभावी बंद झाल्याने पाण्यासाठी गावकऱ्यांना वनवण करावी लागत आहे.तर याच कामामुळे 6 महिन्यापासून बसफेरी बंद झाल्याने माजी सभापती विजय कोरेवार यांनी सावली पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे.

         सावली तालुक्यातील मौजा खेडी येथे जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे एक कोटी किंमतीचे काम 6 महिन्यापूर्वी असित अधीर मंडल चंद्रपूर या ठेकेदाराकडून सुरु करण्यात आले. 

        विहिरीचे काम अर्धवट असतांना व टाकीचे कामही पूर्ण झाले नसताना गावातील वितरिका व नळ जोडणीचे काम करण्यात आले.काम करताना लहान पोकलन मशीनने खोदकाम न करता जेसीबीच्या सहाय्याने सिमेंट रोड पोडले परंतु खड्डे तसेच ठेवले.

        त्यामुळे गावात रहदारीस अडचणी येत आहेत.मुख्य रस्ताही खोदून ठेवल्याने महामंडळाची बस बंद झाली असून विद्यार्थी,वृद्ध व प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. 

         पूर्वी टेकाडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतून पाणी मिळत होते. पण विहिरीचे व टाकीचे काम पूर्ण न करता नियोजना अभावी काम केल्याने मिळणारे पाणीसुद्धा बंद झालेले असून मौजा खेडी वासियांना पिण्याचे पाणी सावलीवरून आणावे लागत आहे.

        यामुळे नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.सदर कामही कंत्राटदाराने बंद केले असून पाणी व रहदारीस नागरिकांना अडविणे हे फौजदारी गुन्ह्यास पात्र असल्याने माजी पंचायत समिती सभापती विजय कोरेवार यांनी सावली पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. 

       खेडी गावातील पाईपलाईन कामाचे कंत्राट गैरतक्रारदार असित मंडल यांचेकडे असून त्यांच्या कामाच्या अलगर्जीपणामुळे गावातील पाणीपुरवठा बंद झाला आहे,बस फेरी बंद झाली आहे.

        त्यामुळे गावाकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.पिण्याचे पाण्यापासून वंचित ठेवणे व रहदारीस अडचण आणणे हे फौजदारी पात्र गुन्हा असल्याने कारवाई करण्यासाठी सावली पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे.