ब्रेकिंग न्यूज… — शॉर्ट सर्किटमुळे 65 वर्षीय महिलेचे घर जळाले… — रोख रकमेसह घरातील सर्व साहित्य जळून खाक… — सुदैवाने जिवीतहानी नाही, सांगवा बु येथिल घटना…

युवराज डोंगरे/खल्लार 

         उपसंपादक

           नजिकच्या सांगवा बु येथिल ६५ वर्षीय वृध्द महिलेच्या घराला आज (२मार्च)दुपारच्या सुमारास शॉट सर्किटमुळे आग लागुन त्या आगीत वृध्द महिलेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

          शांताबाई रामहरी डाहे वय ६५ रा.सांगवा बु  यांच्या दुपारच्या सुमारास घरात शॉट सर्किट झाल्यामुळे घरामध्ये आग लागली या आगीत घरातील सर्व महत्त्वाचे कागदपत्रे, कपडे, सर्व सामान व ९ किंटल कापसाची रोख व इतर रोख रक्कम जळून खाक झाले. यामुळे शांताबाई डाहे यांचे खुप मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. शांताबाई यांची आर्थिक परिस्थिती आधीच हलाखीची आहे त्यात आणखी भर पडली.लोकप्रतिनिधीनी नुकसान ग्रस्त वृद्ध महिलेस त्वरित आर्थिक मदत मिळवून दयावी अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे.

         घटनेच्या वेळी घरामध्ये कुणीही नव्हते त्यामुळे आगीने घरातील पूर्ण सामान जळाले घरी कुणी नसल्यामुळे सुदैवाने जिवीतहानी झाली नाही.