कन्हान शहराच्या रस्त्यावरील कुत्र्यांना निर्दयीपणे मारून क्रुरतेने वाहनात भरून नेणा-या विरूध्द गुन्हा दाखल.. –घटनेचा विडिओ वायरल झाल्याने आर.ए.डी.संस्थेव्दारे पो.स्टेशनला तक्रार. 

     कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

पारशिवनी : – नगरपरिषद कन्हान अंतर्गत शहरातील रस्त्यावरील कुत्र्याना निर्दयीपणे मारून रक्त बंबाळ अवस्थेत क्रुरतेने चारही पाय व तोंड बांधुन वाहनात टाकुन नेणा-याचा विडिओ वायरल झाल्याने आरएडी बहुउद्देशिय संस्थेच्या तक्रारी वरून कन्हान पोस्टेला कंत्राट देणारे,कंत्राट घेणारा कंत्राटदार व वाहन चालक अशा तिन लोकाविरूध्द गुन्हा दाखल करून पुढील तपास व कार्यवाही कन्हान पोलीस करित आहे. 

             गुरुवार (दि.२९) फेब्रुवारी ला कन्हान नगर परिषद परीसरात रस्तावरील कुत्र्यांना बेधम मारहान करून रक्त बंबाळ स्थितीत क्रुरतेने त्यांचे चारही पाय,तोंड बांधुन नविन नगरपरिषद इमारती सामोर टाटा एस मिनी ट्रक क्र.एमएच ३१ सीबी ५९३२ या वाहनात भरून नेणा-यांचा विडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने आरएडी बहुउद्देशिय संस्थाचे श्री.अंकीत निलकंठ खळींदे राह. वाठोडा,नागपुर यांनी घटना स्थळी पोहचुन प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली व या प्रकरणी दोषी कंत्राट देणारे,कंत्राट घेणारे व वाहन चालक अश्या सर्वावर गुन्हा दाखल केला.

       त्यांनी त्या मुक्या प्राणी कुत्र्यांना जिथेही नेऊन सोडले असेल तेथुन परत आणुन त्याचा उपचार करून पुर्वरत अधिवासात सोडण्यात यावे,तसे न केल्यास प्राणी हत्येचा सुध्दा गुन्हा दाखल करण्याच्या तक्रारी वरून कन्हान पोस्टे ला १) दिनेश दिवाकर राऊत वय ३२ वर्ष रा. रामनगर पिपरी, २) हरिश जयराम तिडके वय ४० वर्ष रा. शिवाजी नगर कन्हान, ३) अजय बकाराम चव्हाण वय ४८ वर्ष रा पिपरी कन्हान यांचे विरूध्द कलम ११९ प्राण्यांना कुरतेने वागणुक,मुंबई पोलीस अधिनियम १९६० कायदा, ४२८,३४ भादंवि अन्वये नुसार गुन्हा दाखल करून तीनही आरोपीना ताब्यात घेतले व पुढील तपास कन्हान ठाणेदार श्री. उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करित आहे.