आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने दि.५ फेब्रुवारीपासून सत्संग व महाराष्ट्राच्या सांस्कृतिचे दर्शन…

दिनेश कुऱ्हाडे

   उपसंपादक

आळंदी : आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते व आध्यात्मिक गुरु श्री श्री रवीशंकर दि. ५ ते ८ फेब्रुवारी दरम्यान पुणे दौऱ्यावर आहेत. या काळात ते सरपंचांसह नैसर्गिक शेती तंत्राचे प्रशिक्षण घेतलेल्या दहा हजार शेतकरी, औद्योगिक क्षेत्रातील विविध कंपन्यांचे अधिकारी, प्रेरणादायी व्यक्ती व आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

         आळंदी येथील मरकळ येथे होणारा ज्ञान, भक्ती आणि संस्कृतीचा एक अनोखा महोत्सव पुणेकरांसाठी पर्वणी ठरणार आहे. 

          आळंदीजवळील मरकळच्या आर्ट ऑफ लिविंगच्या त्रिवेणी आश्रमात चारही दिवस संध्याकाळी सत्संग व महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विविधतेचे दर्शन घडवणारे कार्यक्रम होणार आहेत.

          यात पोवाडा, शिवराज्याभिषेकसोहळा, नाशिक ढोल वादन, आदिवासी व कोळी नृत्य व खेड्यांमधील दिनक्रमांची माहिती देणाऱ्या कार्यक्रमांचा समावेश आहे.

            सोबतच पुण्याची सांस्कृतिक संपन्नता दर्शविणारा जगप्रसिद्ध गणेशोत्सव, दिंडी , नांदी आणि हरिदास शिंदे यांच्या गोंधळाचे सादरीकरण होईल, अशी माहिती सुनील पोद्दार, धीरज अगरवाल, स्वामी प्रणवानंद, राजय शास्त्री, कुमकुम नरेन यांनी पत्रकार परिषदेत दिली.