राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनाचा समारोप..

      रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनिधी..

चिमूर :- गांधी सेवा शिक्षण समिती चिमूर द्वारा संचालित राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने महाविद्यालयात सांस्कृतिक महोत्सवाचा समारोप यशस्वी पार पडला.

         या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून गांधी सेवा शिक्षण समिती चे अध्यक्ष डाॅ.दिपक यावले उपस्थित होते.त्यांनी विद्यार्थ्याना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

        कार्यक्रमास गांधी सेवा शिक्षण समितीचे सचिव प्रा.विनायक कापसे,सहसचिव श्री.नारायणराव डांगाले,कोषाध्यक्ष प्रा.मारोतराव भोयर,निवृत्त प्राध्यापक धर्मराज वरभे,समाजसेवक दिघोरे,माजी शिक्षकेतर कर्मचारी कानिरामजी कुमरे उपस्थित होते.

          प्राचार्य डॉ.अश्विन चंदेल यांनी मार्गदर्शन केले.उपप्राचार्य डॉ प्रफुल्ल बन्सोड,मराठी विभागप्रमुख प्रा.कार्तिक पाटील,विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी डॉ राहांगडाले उपस्थित होते. 

       या प्रसंगी विद्यार्थ्यांनी स्वागत गिताने पाहुण्यांचे स्वागत केले.तसेच विविध खेळात व सांस्कृतिक कार्यक्रमात प्राविण्य प्राप्त कलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. 

        या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.आशुतोष पोपटे,सांस्कृतिक विभागाचे प्रा.पितांबर पिसे,शारिरिक क्रिडा विभागाचे डॉ.मेंदुलकर,प्रा.रोकडे यांनी केले तर प्रास्ताविक डॉ कामडी यांनी केले.आभार कानिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य राकेश कुमरे यांनी मानले. 

       कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर यांनी परिश्रम घेतले.महाविद्यालयीन क्रिडा स्पर्धा बौध्दीक स्पर्धा,संस्कृतिक कार्यक्रम प्राचार्य डॉ अश्विन चंदेल यांच्या मार्गदर्शनात यशस्वीरित्या संपन्न झाला. 

         महाविद्यालयातील विद्यार्थ्याचा वार्षीक स्नेहसंमेलन उत्सवास उदंड प्रतिसाद होता व त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता.