सेंदूरवाफा येथे सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त मोफत आरोग्य शिबिर…

      ऋग्वेद येवले 

नागपूर विभागीय प्रतिनिधी

            भीमपर्व ग्रुप साकोली तर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती 3 जानेवारी 2024 ला दुपारी 1 ते 4 वाजेपर्यंत मोफत नेत्र ,शुगर व आरोग्य तपासणी शिबिर वेळूवन बौद्ध विहार सेंदुरवाफा जिल्हा भंडारा येथे घेण्यात येणार आहे. 

           कार्यक्रमाचे उद्घाटक पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी अश्विनी मांजे करणार असून अध्यक्षस्थानी माजी आमदार व बालरोग तज्ञ डॉ हेमकृष्ण कापगते प्रमुख अतिथ म्हणून तालुका आरोग्य अधिकारी डॉ रुपेश बडवाईक, पोलीस निरीक्षक राजेश थोरात ,विस्तार अधिकारी के डी टेंभरे, डॉ रवींद्र कापगते ,नेत्रतज्ञ डॉ ओमेंद्र येळे, डॉ रवींद्र कापगते, डॉ पल्लवी बडवाईक, आयुर्वेदिक कन्सल्टंट डॉ केशव कापगते, डॉ होमिओपॅथिक तज्ञ डॉ राजेश कापगते ,डॉ नितीन गुप्ता, दंत डॉ महेंद्र गणवीर भंडारा, दंत चिकित्सक डॉ धनंजय कापगते, डॉ अनिल शेंडे, वैद्यकीय अधिकारी डॉ संकेत परशुरामकर, माजी नगरसेवक रवी परशुरामकर , माजी नगरसेवक रोहिणी मुंगुलमारे, शैलेश शहारे वेलूवन बुद्ध विहाराचे अध्यक्ष रूपचन टेंभुर्ण, उपाध्यक्ष मुरलीधर बोदेले, कोषाध्यक्ष प्रकाश राऊत यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

          तरी या आरोग्य शिबिराच्या जास्तीत जास्त लाभ घेण्याची आव्हान आयोजक पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते डी जी रंगारी तर भीम पर्व ग्रुपचे अश्विन रंगारी, शुभम खांडेकर, शीलवान रंगारी, आकाश राऊत, पूजा वासनीक, इतर कार्यकर्त्यांनी केलेला आहे.