नव्या वर्षाचे स्वागत केले सांस्कृतिक कार्यक्रमाने… — जि.प.केंद्रीय उच्च प्राथ. शाळा साकोलीचा अभिनव उपक्रम…

     ऋग्वेद येवले 

नागपूर विभागीय प्रतिनिधी 

     साकोली : नव्या वर्षाचे स्वागत हे शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमाने केले असून येथे लहान विद्यार्थी विविध महापुरुषांच्या वेषभूषेत येऊन एक आगळा वेगळा कार्यक्रम साकोलीत सोमवार ( ०१.जाने.) ला संपन्न झाला. 

     नविन वर्षाच्या स्वागतासाठी जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा क्रं ०१ गणेश वार्ड साकोलीत हा कार्यक्रम घेण्यात आला. यात इयत्ता १ ली ते ७ वी तील विद्यार्थी विद्यार्थिनींनी अनेक महापुरुषांच्या वेषभूषेत येत फैन्सी ड्रेस स्पर्धा व विविध नाट्य पात्रातून उत्कृष्ट अभिनय सादर केले.

           यात भारत माता, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पं.जवाहरलाल नेहरू, छत्रपती शिवाजी महाराज, दक्षिणात्य आप्पा वेशभुषा, सावित्रीबाई फुले, भारतीय क्रिकेटपटू अश्या वेषभूषेने विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांची आणि पालकवर्गांची मने जिंकली हे विशेष.

         सदर कार्यक्रम आयोजीत करण्यासाठी मुख्याध्यापक डी. डी. वलथरे, सहायक शिक्षक एम. व्ही. बोकडे, निर्णायक पंच आर. आर. बांगळे, बलविर राऊत, टि. आय. पटले, कार्तिक साखरे, आरती कापगते, शाळा व्यवस्थापन सदस्य आशिष चेडगे, मदतनीस रेषमा कोवे, छन्नू मडावी, कविता बावणे आदींनी सहकार्य केले.

         सांस्कृतिक कार्यक्रमात संचालन शिक्षिका शालिनी राऊत यांनी केले. कार्यक्रमात गणेश वार्ड निवासी, पालकवर्ग आपले पाल्यांचे गुणकौशल बघण्यास मोठ्या संख्येने उपस्थित होते.