आळंदीत दलित पँथरकडून ५ हजार लाडू व पाणी वाटप…

दिनेश कुऱ्हाडे

   उपसंपादक

आळंदी : एक जानेवारी या २०६ व्या शौर्यदिनी ऐतिहासिक विजयस्तंभ या ठिकाणी होणाऱ्या मानवंदना कार्यक्रम प्रसंगी लाखो अनुयायांची गर्दी होत असते.भीमा कोरेगाव याठिकाणी जाण्यासाठी महाराष्ट्रातुन अनेक अनुयायी हे आळंदी मार्गे जात असतात.

          याच अनुषंगाने आळंदी येथे खेड तालुका दलीत पँथर संघटनेच्या माध्यमातून शौर्य दिना निमित्त भीमा कोरेगाव याठिकाणी विजय स्तंभास मानवंदना देण्यासाठी जाणाऱ्या भीमसैनिक तसेच बंधू भगिनींना 5 हजार मोतीचुर लाडू तसेच 5 हजार पाणी बॉटल मोफत वाटप खेड तालुक्याचे अध्यक्ष रवींद्र रंधवे यांच्या माध्यमातून करण्यात आले.

           यावेळी माजी नगराध्यक्ष रोहीदास तापकीर, उपनगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, माजी नगरसेवक रमेश गोगावले, उद्योजक विनय देवकर, अतुल चिकटकर, विकास बडगे सुहास देवकर, चेतन कुऱ्हाडे, गोविंदा कुऱ्हाडे, साहिल विरोकर, कुणाल माने, पुरुषोत्तम गिरी, प्रल्हाद सानप, नारायण शिंदे, राज यादव, संतोष रंधवे, गणेश रंधवे, दलीत पँथर चे 80 सालातील छावणी प्रमुख राहुल(दादा)रंधवे, गणेश लाड, धिरज कांबळे, पंकज शिंदे प्रसेनजीत रंधवे व सर्व पँथर्स कार्यकर्ते उपस्थित होते .