राकेश चव्हाण
कुरखेडा तालुका प्रतिनिधी
कुरखेडा परिसरातीलआदिवासी ग्रामीण विकास शिक्षण संस्था द्वारा संचलीत संस्कार पब्लिक स्कूल अँड जुनियर कॉलेज च्या विद्यार्थिनींनी बोर्डाच्या दहावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत मुलींनी पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. परीक्षेच्या निकालात विद्यार्थिनींचे वर्चस्व दिसून आले असून पालक व शिक्षकांकडून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.
यामध्ये कृतिका प्रशांत राजूत हिने 94 टक्के गुण मिळवून अव्वल स्थान पटकावले. तसेच वैदिका मुलचंद शिवणकर हिने 92.20 टक्के, सारा शाकीर पठाण हिने 92 टक्के गुण मिळवत उत्तम यश मिळविले. जागृती जोगेश्वर सोरते हिने 86.80 टक्के तर खुशी रमाकांत जोगे हिने 86.60 टक्के गुण प्राप्त करून यशाची परंपरा कायम ठेवली.
विद्यार्थिनींच्या या यशामुळे कुरखेडा व तळेगाव परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



