Home Social “बुद्धाचा जन्म हा सुखद असतो.” नालंदा बुद्ध विहाराच्या बुद्धजयंती समारंभात भंते प्रा.अनोमदर्शी...

“बुद्धाचा जन्म हा सुखद असतो.” नालंदा बुद्ध विहाराच्या बुद्धजयंती समारंभात भंते प्रा.अनोमदर्शी यांचे प्रतिपादन…

युवराज डोंगरे/खल्लार 

         उपसंपादक 

    “तृष्णा हेच मानवी जिवनाच्या दुःखाचे कारण असून, दुःखाचे मूळ व त्यावरील आर्य अष्टांगिक मार्गाचा उपाय विशद करणारे बुद्धविचार हेच मानवी सुखाचे गमक होय. म्हणूनच बुद्धाचा जन्म हा समस्त जगासाठी सुखद होय.“ असे प्रतिपादन भंते अनोमदश्शी यांनी केले. 

         साईनगर परिसरातील नालंदा बुद्ध विहाराच्या बुद्धजयंती समारंभाच्या कार्यक्रमात धम्मदेशना देतांना ते बोलत होते. नालंदा बुद्ध विहाराचे अध्यक्ष एकनाथ वासनिक कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून धम्ममंचावर उपस्थित होते.

        तथागत भगवान बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मातोश्री रमाईंच्या, शिवाजी महाराज आणि क्रांतिबा ज्योतिराव फुले यांचे पुतळ्याला अभिवादन, माल्यार्पण करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.         

        कोंडेश्वर रोडवरिल सुप्रसिद्ध धम्मभूमीचे जनक तसेच आंबेडकरी चळवळीतील दानशूर व्यक्तिमत्त्व भगवान इंगळे यांचे हस्ते नालंदा बुद्ध विहारावरील पंचशिल ध्वजारोहण करण्यात आले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशिय अध्ययन मंच तथा नालंदा बुद्ध विहाराच्या वतीने मान्यवर पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.  

       सायंकाळच्या सत्रातील कार्यक्रमात भव्य धम्मरॅलीने संपन्न झाली. साईनगर परिसर बुद्धविहार कृती समितीचे मुख्य संयोजक देवाभाऊ शेंडे यांच्या नेतृत्वात साईनगर परिसरातील सर्व बुद्धिस्ट संघटनांनी सहभाग नोंदविला. परिसरातील बौध्द उपासक-उपासिका शुभ्र वस्त्र परिधान करून हातात मेणबत्ती घेऊन रॅलीत मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. अमरावतीचे उपमहापौर सचिन भेंडे, नगरसेविका मंजुषा जाधव, माजी महापौर रिना नंदा यांचेसह अनेक ओबीसी बांधव धम्मरॅलीत सहभागी झाले होते. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने नालंदा बुद्ध विहार येथे रॅलीचा समारोप झाला.

     समारोपीय कार्यक्रमात भंते राजरत्न यांनी उपस्थितांना त्रिशरन पंचशील दिले. सामूहिक स्नेहभोजनाने बुद्धजयंती समारंभाची सांगता झाली. 

        नालंदा बुद्ध विहाराचे कोषाध्यक्ष अरुण रामटेके यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशिय अध्ययन मंचाचे अध्यक्ष एकनाथ वासनिक यांनी रॅलीचे नियोजन व विहाराची भूमिका स्पष्ट केली. संस्थेचे उपाध्यक्ष पद्माकर मांडवधरे यांनी आभारप्रदर्शन केले. यावेळी मान्यवरांची समायोचित भाषणे झालीत. 

       कार्यक्रमाला विनायक दुधे, भगवान इंगळे, रविंद्र चवरे, देवा शेंडे, सुनिल टेंभूरने, विलास मोहाडे, साहेबराव नाईक, चंदू रामटेके, प्रितम रामटेके, पद्माकर मांडवधरे, सूरज मंडे, संजय रामटेके, राजू खिराडे, डॉ.धर्मेंद्र दुपारे, नाना गवई, सतीश नाईक, रविंद्र गेडाम, रतन उके, छत्रपती पवार, सागर खंडारे, प्रल्हाद इंगोले, नितीन खडसे, राजेश खंडारे, भिमराव वसुकर, किशोर रक्षे, ओमप्रकाश रामटेके, सुनिल शेंडे, जानराव वाघमारे, अवधूत शेंडे, भिमराव दंदे, सत्यवान लांजेवार, सहदेव गजभिये, गौतम गजभिये, सुदेश वासनकर, ताराचंद शेंडे, निलेश दांडगे, नागेश खोब्रागडे, प्रशांत भगेवार, शैलेश मोहोड, अमित गणवीर, नरेंद्र टेंभूरणे, सुनिल तायडे, प्रमोद मेश्राम, मनोहर दंदे, भा.ई. सरकटे, वामनराव रामटेके, भाऊराव दवणे, डॉ. बेले, प्रितम रामटेके, समाधान मोहोड, संतोष कुऱ्हेकर, श्रीकृष्ण दहीकर, परमेश्वर गायकवाड, अरुण बडगे, अशोक खवड, डॉ. प्रदीप इंगोले, रमेश धाकडे, खुशाल मेश्राम, अनिकेत पाटील, राजेंद्र मेश्राम, सचिन हांडे, राजेंद्र बनसोड, हिम्मत नागदिवे, प्रेमदास इंगळे, दिनेश चापके, हंसराज श्रीरामे, डॉ. मनिष मोहोड, सुभाष दुपारे, शैलेश मोहोड, अशोक मोरे, अरुण धाबर्डे, रामचंद्र खंडारे, परमेश्वर गायकवाड, विजय वाहने, निलेश मेश्राम, डॉ. फ्रफुल वराळे, डॉ. प्रविण राऊत, विजया खंडारे, गौरव साबळे, तसेच मातोश्री रमाई महिला मंडळाच्या रमा दंदे, वंदना चवरे, महानंदा वासनिक, आरती शेंडे, इंदिरा दुधे, कुंजलता गेडाम, प्रतिभा नागदिवे, साधना नागदिवे, संगिता मंडे, सुनिता रामटेके, साधना इंगळे, पुष्पलता वसुकर, विद्या गवई, विद्या रामटेके, प्रभा मेश्राम, प्रियांका वराळे, रोशनी आंधळे, क्रांती भगेवार, लता मेश्राम, सुचिता तिरपुडे, अर्चना मेश्राम, सुमन ब्राह्मणे, राजकन्या खंदारे, आशा मेश्राम, अनिता गवई, शिला तायडे, सुनंदा भोवते, सुजाता बडगे, ढोके ताई, कमला वासनिक, अंजली अडकणे, रेखा टेंभुरणे, सरला दांडगे, मिना पारवे, माधुरी रामटेके, तारा लिंघाटे, योगिता सरोदे, अनिता गवई, वंदना नन्नावरे, विद्या खंडारे, प्रा. ज्योत्स्ना बनसोड, सरला दांडगे, मंदा मेश्राम, शुभांगी मोहोड, शिल्पा राऊत, अस्मिता पाटील, प्रीती नंदेश्वर, जया दांडगे, रेखा टेंभूरने, सारिका गोंडाने, रमा दवणे, किरण गजभिये, जयमाला रामटेके, प्रभा मोहोड, सविता खडसे, विद्या गुडधे, जया इंदोरे यांचेसह परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.